धक्कादायक! कफ सिरपमुळे 6 मुलांचा मृत्यू; Coldrif आणि Nextro-DS सिरपवर बंदी

छिंदवाडा : मुलांच्या सर्दी-खोकल्यावर दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमुळे चक्क किडनी निकामी होऊन 6 निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील कोयलांचल परिसरात समोर आली आहे. या प्रकरणी तपासादरम्यान दोन सिरपमधील ‘डायएथिलीन ग्लायकॉल’ (Diethylene Glycol) नावाच्या घातक रसायनामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
मुलांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय आहे?
20 सप्टेंबरपासून परासिया, उमरेठ, जाटाछापर आणि बडकुही परिसरात मुलांना सर्दी, खोकला आणि ताप होत असल्याने स्थानिक डॉक्टरांनी Coldrif आणि Nextro-DS कफ सिरप दिला होता. मात्र काही दिवसांतच मुलांचा मूत्रप्रवाह बंद होऊन त्यांना गंभीर अवस्थेत नागपूर आणि छिंदवाडा येथील रुग्णालयात दाखल करावं लागलं.
बायोप्सी आणि वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले की, यामध्ये कोणताही विषाणू नव्हता. प्रत्यक्षात मुलांच्या किडनीवर परिणाम औषधातील रसायनांमुळे झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
या दोन कफ सिरपवर बंदी
छिंदवाड्याचे जिल्हाधिकारी शीलेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, Coldrif आणि Nextro-DS या दोन कफ सिरपमध्ये वापरण्यात आलेल्या डायएथिलीन ग्लायकॉल या रसायनामुळे मुलांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सिरपच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.
प्रशासनाची पालकांसाठी महत्वाची सूचना
बंदी घातलेली औषधे वापरू नयेत, विकूही नयेत
मुलांचा उपचार फक्त सरकारी रुग्णालयातच करावा
खासगी दवाखान्यांमधून औषध घेण्याआधी प्रशासकीय माहितीची खात्री करावी
जनजागृतीसाठी गावागावात पत्रके वाटप सुरू
तपासात पुढे काय समोर आलं?
पुणे व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट, ICMR दिल्ली आणि भोपाळच्या वैद्यकीय संस्थांनी दिलेल्या रिपोर्ट्समध्ये कोणताही जीवाणू/विषाणू आढळून आलेला नाही.
मृत्यूचं कारण हे औषधांमधील रासायनिक विषबाधा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
यानंतर प्रशासनाने आपत्कालीन बैठक घेऊन पुढील उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे.
मुलांचं औषध खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
डॉक्टरांचा सल्ला घ्या
ब्रँडेड आणि WHO मान्यताप्राप्त औषध वापरा
अनोळखी किंवा स्वस्त कफ सिरप टाळा
सोशल मीडिया किंवा स्थानिक सल्ल्यावरून औषध घेऊ नका
6 निष्पाप जीव गेले, पण इतरांचे प्राण वाचवू शकतो!
हा प्रसंग पालकांसाठी मोठा इशारा ठरला आहे. मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांबाबत अधिक जाणीवपूर्वक निर्णय घेणं ही काळाची गरज आहे. प्रशासनाकडून दोषी कंपन्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.



