गो. से. महाविद्यालयामध्ये माहिती अधिकार कार्यशाळा संपन्न

खामगाव – विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, गो. से. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग व खामगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्ताने २९ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धनंजय तळवणकर सर अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन म्हणून खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक नितीन चव्हाण,सारिका नारखेडे व पोलीस कॉन्स्टेबल आशिष ठाकूर व माहिती अधिकार कार्यकर्ते जयेश दळवी विचार मंचावर उपस्थित होते यावेळी विचार मंचावरून पोलीस उप – निरीक्षक नितीन चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, माहिती अधिकार हा राज्यकारभारात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी उपयोगी असून लोकहित साधण्यासाठी हा एक महत्त्वाचा अधिनियम आहे या कायद्यामधील चांगल्या बाबी बरोबर अनेक वेळा गैरमार्गाचा अवलंब करणारे प्रकार देखील आपल्या निदर्शनास येत आहेत असे ते बोलताना म्हणाले. माहिती अधिकार कार्यकर्ते जयश दळवी यांनी आपल्या भाषणांमधून अधिनियमातील अनेक बारकावे कलमानुसार उपस्थिता समोर मांडले. माहिती अधिकारा बाबत व्यक्ती निरीक्षण माहिती कशी मिळवणे, फीस कशी भरणे त्या संदर्भामध्ये सविस्तर असे मार्गदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक सारिका नारखेडे यांनी आपल्या भाषणांमधून नियम (८) च्या संदर्भात विशेष माहिती दिली. कोणत्या बाबीची माहिती देता येत नाही यावर विस्तृत असे मार्गदर्शन त्यांनी या वेळी केले पोलीस कॉन्स्टेबल आशिष ठाकूर यांनी देखील मार्गदर्शन केले त्याचबरोबर उपस्थितीमध्ये माहिती अधिकार संदर्भात असलेल्या विविध शंकाचे निरसन प्रश्न उत्तराच्या माध्यमातून करण्यात आले. या कार्यशाळेसाठी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा रामकृष्णजी पवार यांनी दिलेल्या सहकार्यामुळे कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील सर्व विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर सर यांनी माहिती अधिकारा संदर्भात मार्गदर्शन करून कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाचे प्रा डॉ बी एम टकले यांनी केले त्याचबरोबर उपस्थितांचे आभारही व्यक्त केले.



