AmravatiLatest News

गो. से. महाविद्यालयात सेवानिवृत्त प्राध्यापकांचा गौरव सोहळा

खामगाव – स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील सांख्यिकीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रफुल उबाळे व ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. मधुकर वानखडे निहीत वयोमानाप्रमाणे महाविद्यालयातून ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बंधूंच्या वतीने त्यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा आयोजित  करण्यात आला. याप्रसंगी सोहळ्याचे अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष अजिंक्य दादा बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रफुल्ल उबाळे तसेच प्रा. डॉ. मधुकर वानखडे यांनी अविरतपणे संख्याशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून सेवा केली. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी संख्याशास्त्राचे धडे दिले. आज त्यांच्या मार्गदर्शनात अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्य करत आहेत. ही त्यांची मोठी उपलब्धी आहे असे भावपूर्ण उद्गार संस्थेचे कोषाध्यक्ष अजिंक्यदादा बोबडे यांनी काढले. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील शैक्षणिक कार्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शैक्षणिक दृष्टिकोनातून मोलाचे योगदान आहे. यावेळी प्राध्यापकांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व चांदीचे नाणे देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा. डॉ. एम. एस. गायकवाड, प्रा. डॉ. एस. एस. मुळे, प्रा. डॉ. ए. व्ही. पडघन, प्रा. डॉ. व्ही. एस. आठवार, प्रा. डॉ. जी. बी. काळे, प्रा. एस. डी. वाघ (कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षकेतर कर्मचारी श्री. रितेश मोरे, यांनी आपल्या‌ मनोगतातून त्यांच्या गुणकार्याची महती सांगितली व तोंड भरून प्रशंशा केली.  याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती प्रा. डॉ. प्रफुल्ल उबाळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या प्रगतीतच माझे खरे समाधान दडले आहे. या महाविद्यालयाने मला घडवले आणि मी जेवढे दिले त्यापेक्षा अधिक परतफेड येथे मला मिळाली. मी अत्यंत समाधानी मनाने हे ज्ञानदाराचे कार्य या ठिकाणी केले या संस्थेचे माझ्यावर अनंत उपकार आहेत असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. प्रा. डॉ. मधुकर वानखडे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, महाविद्यालयातील विविध समित्यावर मला कार्य करण्याची संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली. विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे मला वेळोवेळी सहकार्य लाभले. याप्रसंगी त्यांनी स्वर्गीय भाऊसाहेब बोबडे व नरेंद्रजी बोबडे यांच्या प्रेमळ सहकार्यशील स्वभावामुळे या ठिकाणी कार्यकर्त्यांना मला खूप आनंद मिळाला. ज्ञानदानाचे कार्य करत असताना कधीच हातचे राखून ठेवले नाही जे माझ्याजवळ होते ते विद्यार्थ्यांनाच मी वाटत आलो आज अनेक ठिकाणी माझे विद्यार्थी विविध क्षेत्रात काम करतात ते पाहून मला माझ्या कार्याची पावती मिळाल्याचे वाटते सहकार्यशील वातावरणामुळे अध्यापन कार्य आनंददायी झाले. या सोबत घालवलेला काळ सदैव स्मरणात राहील. यावेळी या सन्मान  सोहळ्याला श्री. दादासाहेब बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) उपस्थित होते. प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी आपल्या भाषणात नमूद केले “दोन्ही प्राध्यापकांनी शैक्षणिक व नैतिक मूल्यांची परंपरा विद्यार्थ्यांत रुजवली आहे. त्यांचे कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरेल.” या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहून निवृत्त प्राध्यापकांप्रती आपला स्नेह व कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्कार समिती समन्वयक प्रा. डॉ. हेमंत चांडक यांच्यासह प्रा. डॉ. ए. व्ही. पडघन, प्रा. डॉ. एस. टी. वराडे, प्रा. डॉ. डी. टी. आढऊ, प्रा. डॉ. जे. डी. पोरे, प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख, प्रा. सौ. एस. जी. वायचाळ, प्रा. एस. डी. वाघ, श्री. यु. एस. तांगडे, श्री. एस. पी. तांबट व इतर सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button