AmravatiLatest News

गो. से. महाविद्यालयातील प्रा. प्राजक्ता बाठे यांना पी.एच.डी. प्रदान

खामगाव – गो. से. विज्ञान, कला व महाविद्यालय, खामगांव येथील प्राणीशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थिनी व सध्या श्री बी. एस. पटेल महाविद्यालय, पिंपळगाव (काळे) येथे प्राणीशास्त्र विभागप्रमुख व सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या प्रा. कु. प्राजक्ता निवृत्ती बाठे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पी.एच.डी. प्रदान केली आहे. महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ जी.बी.काळे यांच्या मुख्य मार्गदर्शनात “लिमनॉलॉजिकल स्टडी ऑफ लांजुड डॅम नियर खामगांव विथ रेफरन्स टू मॉलिक्युलर फायलोजीनी अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट” हा त्यांच्या पी.एच.डी.संशोधनाचा विषय होता. दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयात कार्यकारी उपप्राचार्य डॉ. पी. व्ही. उबाळे, डॉ. एम. ओ. वानखडे तसेच विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य डॉ. एन. एस. महल्ले, मार्गदर्शक, संशोधन सल्लागार समितीचे समन्वयक डॉ. जी. बी. काळे, बाह्य परीक्षक डॉ. संजय नानवरे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. व्हि. पडघन, यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या ‘ओपन डिफेन्स व्हायवा’ दरम्यान त्यांनी उत्तमपणे सादरीकरण केले. बाह्य परीक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे अत्यंत समर्पकपणे,विस्तृतपणे दिली.

आपण केलेल्या अभ्यासपूर्ण संशोधनाचे होणारे फायदे विशद करतांना प्रा. कु. बाठे यांनी सांगितले की, लिम्नोलॉजिकल अभ्यासामुळे पिण्यासाठी, शेतीसाठी, औद्योगिक विकासाकरिता आणि मनोरंजनासाठी गोड्या पाण्याच्या संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, जैवविविधतेचे संरक्षण, प्रदूषण आणि विविध रोगांचा पाण्यातून होणारा प्रसार रोखण्यासाठी, पाण्याच्या गुणवत्तेचे वेळोवेळी निरीक्षण गरजेचे असते. हवामान बदल, अनुकूलन आणि पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांवर धोरण ठरवितांना समाजातील विविध घटकांना फायदा होतो. असे संशोधन पाण्याविषयीचे विविध घोरणे ठरवितांना, जल परिसंस्था, त्यांच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक प्रक्रिया समजून घेणे, आर्थिक विकासासाठी, संसाधनांच्या संवर्धनाकरिता अत्यंत महत्वाचे आहे. प्रा बाठे आपल्या संशोधनाचे श्रेय आपले आई-वडील, सासू-सासरे तसेच पती श्री विशालराव चेंडाळणे यांना देतात.

प्रा बाठे यांच्या शैक्षणिक उपलब्धतेकरिता विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव बोबडे, सचिव डॉ. प्रशांत बोबडे, प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, उपप्राचार्य (सेवानिवृत्त) डॉ. पी. व्ही .उबाळे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. काल संपन्न ओपन डिफेन्स व्हायवा करिता प्रामुख्याने उपस्थित वनस्पतीशास्त्र विभाग डॉ. ए. व्ही. पडघन, प्रा. नानासाहेब कुटेमाटे, प्रा. सचिन खंडारे, प्रा. सुहास पिढेकर, प्रा. मनोज बाभळे, प्रा. अनिकेत वानखडे, प्रा. ज्योती शर्मा, प्रा. नयना मिश्रा, प्रा. रंगनाथ ठोंबरे, प्रा. मुकुंद सपकाळ, प्रा. वर्षा कोकाटे, प्रा. समिधा उगले, प्रा. ज्ञानेश्वर गायगोळ तसेच पदव्युत्तर प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी- विद्यार्थिनी तसेच संशोधक विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रा. प्राजक्ता बाठे यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सोनाली तायडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अशोक झुंजारे यांनी केले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button