AmravatiEducation NewsLatest News

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा जी.एच. रायसोनी विद्यापीठासोबत शैक्षणिक व संशोधनात्मक करार

माहिती, तंत्रज्ञानासोबत होणार संशोधनात्मक उपक्रमांचे आदानप्रदान-कुलगुरू

अमरावती – (दि. 30.09.2025) :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्याथ्र्यांसाठी शैक्षणिक आणि संशोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी जी.एच. रायसोनी विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्यात आला असून या माध्यमातून माहिती, तंत्रज्ञानासोबत संशोधनात्मक उपक्रमांचे आदानप्रदान होईल, असे मत कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी व्यक्त केले.
                  विद्यापीठ आणि जी. एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती यांच्यात नुकताच शैक्षणिक आणि संशोधनात्मक सामंजस्य करार संपन्न झाला आहे. यावेळी जी. एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, अमरावती विद्यापीठाचे नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, रायसोनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. स्नेहसील जयस्वाल, जनसंपर्क अधिकारी अनिता यादव यांच्यासह विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.
                  सदर करार शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत्य उपयुक्त आणि महत्वाचा ठरणारं आहे. दहा मुद्द्यांना अनुसरून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये वैज्ञानिक संबंध आणि परस्पर सहकार्य वाढवणे, दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षक यांना आवडणा-या क्षेत्रातील माहिती, साहित्य आणि वैज्ञानिक माहितीची देवाणघेवाण या कराराच्या माध्यमातून होणार आहे. तसेच परस्पर हिताच्या क्षेत्रात अध्यापनाला प्रोत्साहन देणे, अभ्यासक्रमाचा विकास करणे, दोन्ही विद्यापीठाचा सेमिनार आणि शैक्षणिक बैठकांमध्ये सहभाग , सहयोगी संशोधन प्रकल्प राबविणे , शैक्षणिक क्रेडिट ट्रान्सफर , दुहेरी पदवी कार्यक्रम राबविणे , संयुक्त पीएच.डी. कार्यक्रम राबविणे. दोन्ही विद्यापीठामधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये शैक्षणिक देवाणघेवाण करणे या महत्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. सामंजस्य करारामुळे प्रगतीची दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड यांनी केले आहे. यापूर्वी विद्यापीठाच्यावतीने नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी सुध्दा सामंजस्य करार झाला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button