Latest NewsMaharashtra

जिल्हा परिषद शिक्षकांसाठी ‘केंद्र प्रमुख’ पदांची ऑनलाइन परीक्षा डिसेंबरमध्ये

मुंबई : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना ‘केंद्र प्रमुख’ (समूह साधन केंद्र समन्वयक) पदांवर नियुक्तीसाठी मर्यादित विभागीय ऑनलाइन स्पर्धा परीक्षा १ ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजीत केली जाणार आहे. या परीक्षेद्वारे एकूण २४१० पदांची भरती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://www.mscepune.in
या अधिकृत संकेतस्थळावर या परीक्षेची अधिसूचना, वेळापत्रक आणि ऑनलाइन आवेदन प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पात्रता व हेतू
या स्पर्धा परीक्षेचा उद्देश सर्व कार्यरत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) व प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) यांना केंद्र प्रमुख पदावर विभागीय मर्यादेत संधी देणे हा आहे. आयोगाचे आयुक्त अनुराधा ओक यांनी सर्व उमेदवारांना अधिक माहितीसाठी परीक्षा परिषद संकेतस्थळाची भेट देण्याचे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button