Amravati

गो. से. महाविद्यालयात सृजनशील कला स्पर्धांचे आयोजन उत्साहात संपन्न

खामगाव : खामगाव नगरीचे भाग्यविधाते, लोकनेते तथा माजी खासदार व विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. भाऊसाहेब बोबडे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त गो. से. महाविद्यालयात महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीच्या वतीने सृजनशील कला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. सौ. श्रद्धा ताई बोबडे (सदस्य, वि. शि. प्र. म.,खामगाव )आणि मा. नीताताई बोबडे (संस्थापक,निसर्ग संस्था) यांच्या हस्ते स्व. भाऊसाहेब बोबडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तसेच उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर जयंती महोत्सवाचे समन्वयक डॉ. डी. एन. व्यास उपस्थित होते. या जयंती सप्ताह निमित्त रांगोळी, पोस्टर प्रेझेंटेशन आणि मेहंदी या स्पर्धा घेण्यात आल्या रांगोळी स्पर्धेसाठी “महिला सुरक्षा /सक्षमीकरण /स्त्री-पुरुष समानता” हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये एकूण 21 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. किरण गिऱ्हे (बी. कॉम. प्रथम वर्ष), द्वितीय क्रमांक कु. वैशाली सुरूशे (एम. कॉम. द्वितीय वर्ष) आणि तृतीय क्रमांक कु. जीया मंधानी (बीसीए द्वितीय वर्ष ) या स्पर्धकांनी मिळवला. मेहंदी स्पर्धेत एकूण 46 स्पर्धकांनी कलात्मक मेहंदी प्रस्तुत केल्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. मुसफेरा फिरदोस (बी.ए. प्रथम वर्ष ), द्वितीय क्रमांक कु. आचल सपकाळ (बी.कॉम. प्रथम वर्ष )आणि तृतीय क्रमांक कु. जीया मंधानी (बी.सी.ए.द्वितीय वर्ष) तसेच उत्तेजनार्थ कु. प्रणवी मिसाळ (बी.कॉम. प्रथम वर्ष ) आणि कु. गौरी होनाले (बारावी, विज्ञान )या विद्यार्थ्यांनी पटकाविला. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेसाठी स्पर्धकांना “स्त्री सामर्थ्याची विविध रूपे” हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये एकूण 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. संस्कृती वाकोडे (अकरावी, विज्ञान ), द्वितीय क्रमांक कु. किरण गिऱ्हे (बी.कॉम. प्रथम वर्ष ) आणि तृतीय क्रमांक कु. प्रिया भटकर (एम.कॉम. प्रथम वर्ष )तसेच उत्तेजनार्थ सौरभ सदांशीव (बी.कॉम. द्वितीय वर्ष )या विद्यार्थ्यांनी पटकावला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून निसर्गप्रेमी मा. नीताताई बोबडे, मा. सौ. श्रद्धा ताई बोबडे, डॉ. पी. पी. ठाकूर लाभले. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलेचे प्रदर्शन 24 तारखेला सुद्धा करण्यात आले आणि या प्रदर्शनामध्ये महाविद्यालयामध्ये चालणारा उपक्रम Nothing is Waste या अंतर्गत बनवले गेलेले साहित्याचे प्रदर्शन  मा. नीताताई बोबडे यांच्या मार्गदर्शना अंतर्गत भरविण्यात आले. या प्रस्तुतीकरणाला समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. डॉ. प्रशांत जी शेळके (मुख्य अधिकारी नगर परिषद खामगाव) आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री.अजिंक्य दादा बोबडे (कोषाध्यक्ष वि. शि. प्र. मं. खामगाव. मा. श्री प्रकाशजी तांबट), (उपाध्यक्ष वि.शि. प्र .मं. खामगाव.)यांनी या प्रस्तुतीकरणाला भेट देऊन अतिशय सकारात्मक अशी प्रतिक्रिया ही नोंदविली.स्पर्धेत झालेल्या सृजनशील कला प्रस्तुतीचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस. तळवणकर, जयंती महोत्सवाचे समन्वयक डॉ. डी. एन. व्यास तसेच महाविद्यालयातील सर्व विभागातील प्राध्यापकांनी भरभरून कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉ. रेश्मा मारवाडी, डॉ. नीता बोचे, प्रा. संगीता वायचाळ, डॉ. जयेश तातेड प्रा. कोमल काळे, डॉ. रोहिणी धरमकर, प्रा. पूनम तिवारी, प्रा. अर्चना पाटील, प्रा. पल्लवी खरात, प्रा. वैष्णवी साहू, प्रा. पायल भन्साली, कु. भाग्यश्री सापधारे यांनी मेहनत घेतली, तसेच श्री. मार्तंड गरुड, श्री. सुखलाल कळसकर, श्री. यश मोरे, कु. कीर्तीमाला टिकार यांनी सहकार्य केले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button