आ. रवी राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीग्रस्त पिकांची केली पाहणी

सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून,१०० टक्के पंचनामे करून १०० टक्के नुकसान भरपाई दिवाळीपुर्वी मिळावी_ .मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी.
शेतकऱ्यांचे शेतात साचलेले पाणी व पिकांचे नुकसान बघण्यासाठी आ. राणा व अधिकाऱ्यांना पाण्यात उतरले.
अमरावती काल पालकमंत्री अमरावती आले असता त्यांना अलीकडील कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तिवसा मतदार संघातील अमरावती तालुक्यातील ब्राह्मणवाडा गोविंदपुर, नांदुरा, धानोरा ,चिचखेड,करजगाव, डवरगाव ,यावली , माउली , व तिवसा तालुक्यातील वरखेड, तळेगाव ठाकूर , सातरगाव , शेंदुरजना बाजार , मोझरी, वऱ्हा, शिवणगाव , कुऱ्हा, मालेगाव या भागातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी संपूर्ण अमरावती जिल्ह्या चे दौरा करून संपूर्ण शेतकऱ्यांचे व्यथा त्यांचे बांधावर जाऊन समजावून घेतल्या व जिल्हा परिषदेच्या बैठकीत शेतकऱ्यांचे दुःख निवेदन देऊन मांडले व वरील मागणी केली त्यानंतर आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतातील अतिवृष्टीग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत त्यांनी दिवाळीपूर्वी तात्काळ नुकसान भरपाई आणि कर्जमाफी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली.
दौऱ्यादरम्यान, आ. राणा यांनी शासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे शेतातील नुकसान पाहणी साठी स्वतः पाण्यात उतरून अधिकाऱ्यांना उतरविले तात्काळ पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
या दौऱ्यात युवा स्वाभिमान पक्षाचे कार्याध्यक्ष धीरज केने , सौरभ कोहळे , अभिजित निमकर , स्वप्नील भाऊ भुयार , देवदत्त कोकाटे, सुधीर भाऊ इंगोले, रमेश भाडे व अमरावती तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.



