Latest News

‘देवळात देव नाही, भ्रष्टाचार आहे!’ – मंदिरात 100 कोटींचा घोटाळा उघडकीस

तिरुपती : गेल्या काही दिवसांपासून तिरुमला तिरुपती देवस्थानम् अर्थात (टीटीडी) कैक कारणांनी चर्चेत आहे. या देशातील सर्वात श्रीमंत अशा देवस्थानी कथित भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आला असून, मंदिरातील जमा रकमेतून जवळपास 100 कोटी रुपयांचा हिशोब लागत नसून, एक महाघोटाळा समोर आला आहे. यामध्ये मंदिर समितीवर कारकून म्हणून काम पाहणाऱ्या व्यक्तीनं सर्वांचं लक्ष वेधून त्यांच्याकडे नेमकी इतकी श्रीमंती कशी हा प्रश्नसुद्धा उपस्थित केला जात आहे.

थोडं मागे वळून पाहिलं असता…
1990 च्या दशकात डोकावलं असता एक 20 वर्षीय मुलगा पेन्डा ज्यंगर मठात सेवेत रुजू झाला. रवि कुमार असं त्याचं नाव. त्याची नेमणूक व्यंकटेश मंदिराच्या अध्यात्मिक कामांची देखरेख करण्यासाठी करण्यात आली होती. 2023 मध्ये जेव्हा याच वक्तीनं वयाचं 54 वं वर्ष गाठलं तेव्हा या व्यक्तिकडे तिथंच कारकुनाचं काम सोपवण्यात आलं. मंदिर समितीतील सर्वात महत्त्वाच्या कामांपैकी एक अशा देवाला दान स्वरुपात येणाऱ्या गोष्टींवर देखरेख ठेवण्याचं काम तो करत होता. तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात दर दिवशी 4-6 कोटी रुपयांचं दान येतं. तीन दशकांमध्ये रवि कुमार सामान्य. कर्मचारी म्हणूनच काम पाहत होता, तो मंदिरात वेळेवर येत होता, वेळेवर घरी निघून जात होता.

मंदिरातील सर्वात मोठी चोरी उघडकीस कशी आली?
रविकुमार एका प्रसिद्ध मंदिरात कारकून म्हणून काम करत होता, मंदिरात येणारं दान मोजण्याचं काम त्याच्याकडे होतं. हे दान कोट्य़वधींच्या घरात असेय तीन दशकांपर्यंत कथित स्वरुपात त्यानं हळुहळू मंदिरातील गोष्टी लांबवत आपली संपत्ती वाढवली. जेव्हा त्याची ही चोरी उघडकीस आली तेव्हाही त्याच्यावर कोणती कारवाई मात्र झाली नाही. हा घोटाळा नेमका किती मोठा होता तोपर्यंत त्याला कोणी हातसुद्धा लावू शकलं नव्हतं. 2023 मध्ये मात्र त्याची प्रामाणिकपणाची प्रतिमा फुटलीय आणि एका सुरक्षा रक्षकानं रवि कुमारला विचित्र कृती करताना पाहिलं.

CCTV नं बिंग फोडलं आणि…
नोटांच्या मोजणीदरम्यान रवि कुमार अनपेक्षित हालचाली करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं. यानंतर जेव्हा सुरक्षा रक्षकानं त्याची तपासणी केली तेव्हा त्यानं हे पैसे आपल्या पार्श्वभागाखाली लपवल्याचं उघडकीस आलं. त्यानं 100 डॉलरच्या 9 नोटा लपवल्या होत्या. रवि कुमार तिरुपतीतील पेन्डा ज्यंगर मठातील परदेशी चलनांच्या मोजणी आणि देखरेखीचं काम करायचा. त्याला पोलिसांनी तब्बल 72 हजार अमेरिकी डॉलर घेऊन पळताना पकडलं.

सोशल मीडियावर हे सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं यासंदर्भात सीआयडी तपासाचे आदेश दिले. आंध्र प्रदेशात यामुळं सरकारचा कारभार, मंदिर प्रशासनाचं काम यासंदर्भात कैक प्रश्न उपस्थित करण्यात आले. IT मंत्री नारा लोकेश यांनी यामध्ये राजकीय हेतू असल्याचं म्हणत वायएसआर काँग्रेसवर गंभीर आरोप लावले. या संपूर्ण घोटाळ्यामध्ये जगनमोहन यांची सत्ता असताना तिरुमला मंदिराच्या दानपेटीतून 100 कोटींहून अधिक रुपयांची चोरी झाल्याचा आरोप करण्यात आला. ज्यामुळं या वृत्तानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं.

तिरुपती मंदिरातील घोटाळ्याबद्दल सांगा?
तिरुमला तिरुपती देवस्थानम्स (TTD) मध्ये कथित भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आला असून, दानपेटीतील (हुंडी) रकमेतून जवळपास १०० कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप आहे.

रवि कुमार कोण आहेत आणि त्यांची भूमिका काय होती?
सी. वेंकट रवि कुमार हे 1990 च्या दशकात 20 वर्ष वय असताना पेद्दा जियांगार मठात रुजू झाले. 2023 मध्ये त्यांना व्यंकटेश मंदिरातील दान मोजणी आणि देखरेखीचे काम सोपवण्यात आले. दररोज 4-6 कोटी रुपयांचे दान येणाऱ्या मंदिरात परदेशी चलनाच्या मोजणीकडे त्यांची जबाबदारी होती.

राजकीय आरोप काय आहेत?
भाजप नेते आणि आयटी मंत्री नारा लोकेश यांनी वायएसआर काँग्रेस सरकारवर (जगनमोहन रेड्डींच्या काळात) 100 कोटींच्या चोरीला आळा घालण्यात अपयश आल्याचा आरोप केला. पूर्वीच्या TTD चेयरमन भुमाना करुणाकर रेड्डी यांना घोटाळ्याचा मास्टरमाइंड म्हटले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button