AmravatiFestival NewsLatest News

पिंगळाई देवि मंदिर व गडाचा विकास घडवुन आणणार – आ. रवि राणा

नवरात्री महोत्सवाच्या महापर्वावर आ.रवि राणा यांनी पिंगळाई गडापर्यत पाई चालुन पिंगळाई देविची पुजा करुन व महाआरती करुन नतमस्तक होऊन घेतले दर्शन

नवरात्रीच्या पर्वावर आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन करुन रक्तदात्याचा व आयोजकांचा आ.रवि राणा यांनी केला सत्कार व सन्मान

आ.रवि राणा यांच्या हस्ते उपस्थित हजारो भाविक भक्तांना केले महाप्रसादाचे वाटप यावेळी ह.भ.प.अँड.सागर देशमुख महाराज व यु.स्वा.पा.जिल्हाअध्यक्ष सौ.सोनाली नवले यांची विशेष उपस्थिती, विकास आराखडा तयार करुन येथील रस्ते, गड व मंदिराचे सौदर्यीकरण व भाविक भक्तांसाठी सोयीसुविधा सह इतर विकास कामे करणार – आ.रवि राणा यांचे आश्वासन.

अमरावती जिल्हयातील व मोर्शी तालुक्यातील हजारो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या नेरपिंगळाई येथील पिंगळाई गडावरील बसलेल्या पिंगळाई देविची नवरात्रात भव्यदिव्य अशी यात्रा असते. देविचे दर्शन घेण्याकरीता संपूर्ण महाराष्ट्रातुन हजारो भाविक भक्त दर्शनाला येऊन देविच्या चरणी नतमस्तक होतात.

त्याचअनुषंगाने बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवि राणा हे सुध्दा नवरात्री महोत्सवाच्या महापर्वावर पिंगळाई गडापर्यत पाई चालुन पिंगळाई देविच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. विशेष म्हणजे नवरात्रीच्या पर्वावर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन श्री.विरेंद्र उपाध्याय व त्यांचा चमुव्दारे करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन आ.रवि राणा यांच्या हस्ते करण्यात याले. या शिबीरामध्ये या रक्तदात्यानी रक्तदान केले. अशा रक्तदात्याचा व आयोजकांचा आ.रवि राणा यांनी सत्कार व सन्मान केला.

तसेच या ठिकाणी भाविक भक्तांसाठी महाप्रसाद सुध्दा ठेवण्यात आला होता. या महाप्रसादाचे आ.रवि राणा यांनी हरीभक्त पारायण अँड. सागर महाराज देशमुख व युवा स्वाभिमान पार्टीच्या अमरावती जिल्हा महिला अध्यक्ष सौ.सोनाली नवले यांच्या उपस्थितीत वाटप केले.

यावेळी पिंगळाई देविच्या विकासाकरीता आपण सदैव कटीबध्द असून एक विकास आराखडा तयार करुन या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम, गडाचे व मंदिराचे सौदर्यीकरण तसेच भाविक भक्तांच्या सोयी सुविधेच्या कामासह इतर विकास कामे करणार असल्याचे आ.रवि राणा यांनी स्पष्ट केले.
यावेळी बाळासाहेब इंगोले, आशिष कावरे, प्रदिप अलोने, धिरज केने, संदेश मेश्राम, सौरभ कोहळे, अभिजीत निमकर, स्वप्नील भुयार, देवदंत्त कोकाटे, सुधिर इंगोले, रमेश भांडे,

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button