शासनाच्या राज्य युवा धोरणाबाबत अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांनी मांडल्या महत्वपूर्ण शिफारशी

नव्याने पदभार सांभाळणाऱ्या क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांचा केला सन्मान , मंत्र्यानी केले डॉ गवईचे कौतुक
अमरावती- राज्यभरातील युवा कार्यक्रमाबाबत ध्येय, उद्दिष्ट व कार्यक्रम अंबलबजावणी करण्याकरिता राज्याच्या युवा धोरणाची निर्मिती करण्यात येते महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्याच्या नवीन युवा धोरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्यात युवा धोरण, २०१२ च्या आधारे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी एक नवीन समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मनीष शंकरराव गवई यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून त्यांनी शासनाच्या राज्य युवा धोरणाबाबत महत्वपूर्ण शिफारशी मांडल्या असून नव्याने पदभार सांभाळणाऱ्या राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांचा सन्मान देखील या प्रसंगी केला.
विशेष म्हणजे ही समिती दर्जा प्राप्त असून राज्यभरातील युवा कार्यक्रमाबाबत ध्येय, उद्दिष्ट व कार्यक्रम अंबलबजावणी करणारी महत्वाची समिती आहे ज्याचे अध्यक्ष खुद्द राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री माणिकराव कोकाटे हे आहेत. डॉ गवई यांची सामाजिक तथा युवक कल्याण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर वरील भरीव कामगिरीला पाहून ही निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण, २०१२’ हे धोरण जाहीर केले होते. मात्र, १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने, हे धोरण सध्याच्या गरजांनुसार अपुरे पडू लागले होते. त्यामुळे, राज्याच्या युवा धोरणामध्ये सुधारणा करून नवीन धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.नवीन धोरणाच्या निर्मितीसाठी आणि जुन्या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी शासनाने एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. .या समितीला राज्याच्या युवकांचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी एक मजबूत आणि सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांचा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून दुसरी बैठक नुकतीच मंत्रालय मुंबई येथे संपन्न झाली या बैठकीत डॉ गवई यांनी या नवीन धोरण युवकांना शिक्षण, रोजगार, क्रीडा, कौशल्य विकास आणि सामाजिक सहभागाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत शिफारशी मांडल्या असून हे नवीन धोरण राज्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान देईल आणि युवकांना आत्मनिर्भर बनण्यास मदत करेल अशी आशा विशेष निमंत्रित समिती सदस्य डॉ मनीष गवई यांनी व्यक्त केली आहे.बैठकीत नव्या धोरणात शिक्षण, रोजगार, उद्योजकता, स्टार्टअप्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), बौद्धिक व सामाजिक विकास तसेच राष्ट्रप्रेम, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्वगुणांची जोपासना याबाबींचा समावेश असावा अशा सूचना डॉ गवई यांनी केल्या .विकसित भारत 2047 च्या दिशेने वाटचाल करताना, नव्या पिढीच्या गरजांनुसार धोरण तयार करणे आवश्यक आहे. शहरी व ग्रामीण भागांतील युवकांना समान संधी मिळाव्यात, यासाठी प्रशिक्षण, सुविधा व योजनांचा समावेश असलेले समतोल धोरण तयार करावे असे देखील सुचविण्यात आले . या धोरणांतर्गत युवा प्रशिक्षण केंद्रे, वसतीगृहे, युवा निधी, पुरस्कार, महोत्सव, व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम तसेच युवा प्रतिष्ठा निर्देशांक यांचा समावेश करण्यात यावा. युवकांचे विचार आणि अपेक्षा समजून घेऊनच हे धोरण आखले गेले पाहिजे. यासाठी शाळा, महाविद्यालये यांच्यासाठी निबंध स्पर्धा तर सोशल मीडिया, सेवा क्षेत्रातील प्रतिनिधी यांना सहभागी करून त्यांच्या सूचनांचा धोरणात समावेश करावा, धोरणात युवक कल्याण विभागाबरोबरच इतर विभागांनीही संघटितपणे आणि समन्वयाने काम करण्यात यावे असे देखील नमूद केले.नव्याने पदभार सांभाळणाऱ्या राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांचा सन्मान देखील या प्रसंगी करण्यात आला. महत्वपूर्ण शिफारशी मांडल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यानी डॉ गवईचे यांचे कौतुक केले. बैठकीला समितीतील आमदार, विविध विभागाचे सचिव, सदस्य उपस्थित होते



