पालकमंत्री यांचे उपस्थितीत मनपाच्या बैठकीत रवी राणा यांची मागणी –५७टक्के ची पठाणी वसुली थांबवा

पालकमंत्र्यांचा पाठिंबा देत_जेवढे भाडे त्यांचे ०५ टक्के कर आकारावा. बैठकीत स्पष्ट निर्णय
दि.२७/०९/अमरावती – काल ना . बावनकुळे पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मनपाच्या आढावा बैठकीत आमदार रवी राणा यांनी व्यापारी व लघु उद्योजकांच्या हितासाठी मोठी मागणी करत ५७ टक्के कर आकारान्याची पठाणी वसुली त्वरित थांबविण्याची मागणी केली. या मागणीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुजोरा देत स्पष्ट निर्देश दिले की, “जेवढे भाडे त्याचे केवळ 5 टक्के भाडे आकारण्यात यावे,” अशी टिप्पणी तयार करून त्यावर ते मान्यता देतील आणि शासनाची परवानगी आवश्यक असल्यास ती देखील घेऊन देतील. असा स्पष्ट निर्णय घेण्यात आला.
ही बैठक नामदार बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा कार्यालयात पार पडली. बैठकीस आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण तायडे, तसेच जिल्हाधिकारी डॉ. आशिष येरेकर, मनपा आयुक्त व प्रशासक सौम्या शर्मा चांडक, भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व अनेक अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत व्यापारी वर्गावर अन्यायकारक पठाणी वसुली थांबवून न्याय देण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला. आमदार रवी राणा यांनी ठामपणे भूमिका मांडत म्हटले की, “मनपाने सुरू केलेली ५७टक्के पठाणी वसुली ही अन्यायकारक असून तात्काळ थांबवावी.”
या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले की, व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये, त्यासाठी संबंधित धोरणाची पुनर्रचना करावी, आणि 5 टक्के भाडे आकारणीसाठी आवश्यक ती प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी.
हा निर्णय शहरातील लहान व मध्यम व्यावसायिकांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे, असे मत बैठकीतील अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.



