Latest NewsMaharashtra

समीर वानखेडे Vs आर्यन खान पुन्हा आमनेसामने; वानखेडेंची थेट कोर्टात धाव

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे विरुद्ध शाहरुख खानचा लेक आर्यन खान असा सामना पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता आहे. आर्यन खानने दिग्दर्शित केलेली Ba*ds of Bollywood या वेबसिरीजविरोधात समीर वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. वानखेडे यांनी शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

समीर वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टात केलेल्या याचिकेत Ba*ds of Bollywoodवर कायमस्वरुपी बंदी करण्याची मागणी केली आहे. तसंच, मालिकेतील एका दृश्यात टवाळी केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. मालिकेतून खोट्या आणि दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक बाबी सादर करण्यात आल्या आहेत. ड्रग्जविरोधी अंमलबजावणी संस्थांना दिशाभूल करणाऱ्या आणि नकारात्मक दृष्टिकोनातून दाखवलं गेलं आहे, असंही याचिकेत म्हटलं आहे.

समीर वानखेडे यांनी याचिकेत म्हटलं आहे की, ‘सीरीजमध्ये एक पात्र सत्यवेन जयते असं म्हणत असल्याचं दाखवलं आहे. ही सीरिज जाणूनबुजून पक्षपाती आणि बदनामीकारक पद्धतीने त्यांच्याविरुद्ध तयार करण्यात आली आहे.’ तसंच, मानहानीच्या याचिकेत समीर वानखेडे यांनी 2 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. जी कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याचा प्रस्ताव आहे.

दरम्यान, Ba*ds of Bollywood या सीरिजमध्ये समीर वानखेडे यांच्या व्यक्तिमत्वाशी मिळते जुळते पात्र दाखवण्यात आले होते. तसंच, ‘वार अगेन्स्ट ड्रग्स’ आणि ‘NCG’ चा अधिकारी दाखवत बॉलिवूड पार्टीत हे पात्र जाते आणि एका अभिनेत्याला अटक करते. मात्र हा सिरीज प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचा संदर्भ थेट समीर वानखेडे यांच्याशी जोडला होता. तसे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र निर्मात्यांनी हे साधर्म्य मान्य केले नव्हते. 2021च्या ड्रग्ज प्रकरणात वानखेडे यांनी आर्यन खानला अटक केली होती.

१) समीर वानखेडे यांनी शाहरुख खानविरुद्ध काय कारवाई केली आहे?
एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टात शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड तसेच नेटफ्लिक्सविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. हा खटला आर्यन खानद्वारे दिग्दर्शित “Ba*ds of Bollywood” या वेबसिरीजविरोधात आहे.

२) याचिकेत समीर वानखेडे यांनी काय आरोप केले आहेत?
वानखेडे यांनी याचिकेत सांगितले की, सीरीजमध्ये खोट्या, दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक बाबी सादर केल्या आहेत. ड्रग्सविरोधी अंमलबजावणी संस्थांना दिशाभूल करणाऱ्या आणि नकारात्मक दृष्टिकोनातून दाखवले गेले आहे. सीरीज जाणूनबुजून पक्षपाती आणि बदनामीकारक पद्धतीने तयार करण्यात आली असल्याचा आरोप आहे.

३) सीरीजमध्ये कोणते पात्र दाखवले आहे ज्याचा वानखेडे यांच्याशी संबंध जोडला जातो?
सीरीजमध्ये “सत्यवेन जयते” हे पात्र दाखवले आहे, जे वानखेडे यांच्या व्यक्तिमत्वाशी मिळते-जुळते आहे. हे पात्र “वार अगेन्स्ट ड्रग्स” आणि “एनसीजी” च्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दाखवले असून, बॉलिवूड पार्टीत एका अभिनेत्याला अटक करताना दिसते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button