Latest NewsMaharashtra

संभाजी भिडेंचा नवरात्रीवर संतापजनक दावा; दांडियावरून ‘निर्लज्ज’ अशी टीका

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत असलेले शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नवरात्रीसंदर्भात आणि दांडियासंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. भारतीय संविधान आणि भारतातील नागरिकांबद्दलही संताप व्यक्त करताना संभाजी भिडेंनी खळबळजनक विधानं केली आहेत.

दांडियाबद्दल वादग्रस्त विधान
सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्यावतीने आयोजित दुर्गामाता दौड प्रसंगी बोलताना संभाजी भिडेंनी गणेशोत्सव आणि नवरात्राचे वाटोळ करून टाकलं आहे, असं म्हटलंय. तसेच हिंदू समाजाने दांडिया खेळणं म्हणजे हांडगेपणा, बुळगेपणा आणि नपुंसकत्वपणा असल्याचं भिडेंनी म्हटलं आहे. “गणेशोत्सव आणि नवरात्रीचे वाटोळ करून टाकलं आहे. दांडिया हा बेकार असून हिंदू समाजाने नवरात्रीमध्ये दांडिया खेळणं म्हणजे हांडगेपणा, बुळगेपणा आणि नपुंसकत्वपणा निर्माण करणारे आहे,” असं विधान संभाजी भिडे यांनी केले आहे. “छत्रपती शिवाजींनी शपथ घेतलेला दिवस विस्कटलेल्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता,” असे देखील भिडे म्हणाले आहेत.

गुलामीची लाज वाटत नसलेला निर्लज्ज लोकांचा देश
आपली लायकी त्या संविधानात असल्याचंही यावेळेस बोलताना संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. “जगात 187 देश आहेत. आपली लायकी काय तर आपली लायकी त्या संविधानात आहे. पोटात मुरड आल्याप्रमाणे विद्वान लोक बोलतात संविधान, अरे कसलं संविधान बोलता?” अशा शब्दात भिडे यांनी संविधानाबाबत उद्विग्नात व्यक्त केली आहे. तसेच, “1300 वर्ष मुस्लिम, युरोपियन लोकांच्या पारतंत्र्यात एखादा खितपत पडलेल्या लोकांचा देश असून त्यांना याची लाज वाटत नाही. ज्यांना पारतंत्र्याची गुलामीची लाज वाटत नसलेला निर्लज्ज लोकांचा देश आहे. आम्हाला फक्त स्वराज्य , स्वातंत्र्य नको आहे हिंदवी स्वातंत्र्य हवे आहे,” असे विधान देखील संभाजी भिडे यांनी केले आहे.

संभाजी भिडे यांनी भारतीय संविधानाबाबत काय मत व्यक्त केलं आहे?
उत्तर: ते म्हणाले, “जगात 187 देश आहेत. आपली लायकी काय तर आपली लायकी त्या संविधानात आहे. पोटात मुरड आल्याप्रमाणे विद्वान लोक बोलतात संविधान, अरे कसलं संविधान बोलता?” यामुळे त्यांनी संविधानाबाबत संताप आणि उद्विग्नता व्यक्त केली आहे.

संभाजी भिडे यांनी भारताच्या इतिहास आणि स्वातंत्र्याबाबत काय विधान केलं आहे?
उत्तर: संभाजी भिडे यांनी म्हटलं की, “1300 वर्ष मुस्लिम, युरोपियन लोकांच्या पारतंत्र्यात एखादा खितपत पडलेल्या लोकांचा देश असून त्यांना याची लाज वाटत नाही. ज्यांना पारतंत्र्याची गुलामीची लाज वाटत नसलेला निर्लज्ज लोकांचा देश आहे. आम्हाला फक्त स्वराज्य, स्वातंत्र्य नको आहे हिंदवी स्वातंत्र्य हवे आहे.” यातून त्यांनी पारतंत्र्याच्या इतिहासाबाबत लाज आणि हिंदवी स्वातंत्र्याची मागणी केली आहे.

हे विधान कुठे आणि कशा प्रसंगी झालं?
उत्तर: हे विधान सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौड या कार्यक्रमात झालं आहे. संभाजी भिडे हे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक असून, त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ते सातत्याने चर्चेत असतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button