विद्याथ्र्यांनो ! मिळालेल्या संधीचं सोनं करा – प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे

विद्यापीठाच्या नवोपक्रम,नवसंशोधन व साहचर्य मंडळाची विद्याथ्र्यांसाठी कार्यशाळा
अमरावती – (दि. 25/09/2025) : पूर्वीसारखी परिस्थिती आज नाही. एका क्लिकवर आज जगभरातील घडामोडी सहजरित्या कळायला लागल्या आहेत. अनेक सोयीसुविधा आज विद्याथ्र्यांसाठी आहेत. एवढेच नाही, तर शासनाच्या अनेक योजना देखील आहेत. त्यामुळे विद्याथ्र्यांनो, मिळालेल्या संधीचं सोन करा, असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाच्यावतीने विद्याथ्र्यांसाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून अमरावती शहरातील प्रसिध्द अस्पा बंड सन्सचे संचालक श्री रणजीत बंड, वक्ते श्री शिवाजी धवड, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड उपस्थित होते.
अस्पा बंड सन्सचे श्री रणजीत बंड म्हणाले, आज जगात तंत्रज्ञान प्रचंड वाढले आहे. एखादी नवीन कल्पना सुध्दा भविष्यात मोठा आकार घेऊ शकते. मारुती गाड¬ांचे शो रुम सुरू करण्यावेळची स्थिती व त्या वेळचे पेचप्रसंगही याप्रसंगी विद्याथ्र्यांना सांगतांना इन्क्युबेशन सेंटर तुमच्या मदतीसाठी सदैव तयार आहे, प्रयत्नांपाठी सदैव इ·ाराची साथ असते. त्यामुळे विद्याथ्र्यांनी आत्मवि·ाासाने पुढे जावे, नवनवीन कौशल्य मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच चित्रफितीच्या माध्यमातून देशभरातील मोठमोठ¬ा उद्योगकत्र्यांच्या कार्याचा आढावा त्यांनी विद्याथ्र्यांना सांगितला. इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद यादव यांनी इन्क्युबेशन व त्याची उपयोगिता याबाबत विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. आयुष्याचा प्रवास करतांना अनेक अडचणी, अपयश येते, मात्र त्याला घाबरुन न जाता आपला प्रवास पुढे सुरू ठेवावा, जोपर्यंत आपण आपले लक्ष्य गाठण्यामध्ये यशस्वी होत नाही.
कार्यशाळेच्या दुस-या सत्रात प्रमुख वक्ता शिवाजी धवड यांनी विद्याथ्र्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. सूत्रसंचालन विकास विभागाच्या उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील यांनी केले. कार्यशाळेला विद्यापीठाच्या विविध विभागाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



