AmravatiLatest News

वसंतराव साऊरकर यांचा वाढदिवस अभिनंदन पेंढारी मित्र मंडळाच्या वतीने साजरा 

निळकंठ मंडळाचे माजी अध्यक्ष काँग्रेस कमेंटीचे माजी अध्यक्ष तथा म न पा माजी पक्षनेते सामाजिक कार्यकर्ते सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व मा. श्री. वसंतराव साऊरकर यांचा 81 व्या वाढदिवस अभिनंदन पेंढारी मित्र मंडळाचे वतीने उत्साह व आत्मीयतेने साजरा करण्यात येऊन त्यांना निरामय आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे आयोजक अभिनंदन पेंढारी यांनी प्रास्ताविकपर भाषणातुन वसंतराव साऊरकर यांच्या सोबत गेली अनेक वर्ष आपण सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असुन त्यांच्या नेतृत्वात आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात वाटचाल करीत असुन त्यांचे मार्गदर्शन प्राप्त केले आहे असे प्रतिदान करीत त्यांना शुभेच्छा दिल्यात यानंतर अभिनंदन पेंढारी व उपस्थितांनी पुष्पगुछ, मोत्याची माळा, दुपट्टा, सन्मानपत्र देऊन वसंतराव व सौ पुष्पाताई साऊरकर यांचा यथोचित सत्कार केला. विलास कारंजकर, प्रा. संजय शिरभाते, प्रमोद गंगात्रे, जगदीश सायसिकमल, प्रा राधेश्याम यादव, विजय बर्वे, सुरेश धावडे, पुष्पाताई साऊरकर, दिपक हुंडीकर यांनी आपल्या भाषणातुन प्रदीर्घ सहवासातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन सतत लाभत राहो असे प्रतिपादन केले. वसंतराव यांनी आपल्या भाषणातुन सत्काराप्रति आभार व्यक्त करीत आपल्या सारख्या प्रामाणिक, निष्ठावंत व मनापासून जुळलेल्या अशा सहकाऱ्या मुळेच माझी वाटचाल यशस्वी झाली व मी मोठा झालो याचे श्रेय आपणास आहे व अशी जिवभावाची मित्रांचा सदैव साथ राहीला हे मी माझे भाग्य समजतो असे विषद केले कार्यक्रमाचे संचालन अभिनंदन पेंढारी यांनी तर आभार प्रदर्शन संजय जैन यांनी केले यावेळी मधुकरराव साऊरकर, धंनजय चतारे, दिपक वडालकर, संजय जैन, अजय गंधे, महेंद्र देशमुख आदी उपस्थित होते 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button