AmravatiLatest News

राज्याचे कामगार मंत्री मा. ना. आकाश दादा फुंडकर यांच्या हस्ते गो. से. महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण

स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे १८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर दरम्यान खामगाव नगरीचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष, माजी खासदार, माजी अध्यक्ष विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ तसेच ‘खामगाव रत्न’ स्व. ॲड. शंकरराव उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्या जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महाविद्यालयाच्या परिसरात ओपन जिम व योगा सेंटरच्या उद्घाटनासाठी महाविद्यालयात आले होते. यानिमित्ताने माननीय नामदार आकाश दादा फुंडकर यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्या निमित्ताने त्यांनी सांगितले की, वृक्षारोपण ही काळाची गरज असून सर्वांनी दरवर्षी किमान एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. निसर्गाशिवाय जीवन शक्य नाही. आज वृक्ष नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हवामान बदल होत आहेत, पावसाचे प्रमाण अनियमित झाले आहे. त्यामुळे निसर्ग वाचवण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. त्यांनी पुढे विद्यार्थ्यांना आवाहन केले की, महाविद्यालयीन जीवनात केवळ शिक्षण घेणेच नव्हे तर पर्यावरणपूरक वृत्ती विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणासह स्वच्छता, पाणी बचत, प्लास्टिकमुक्ती यासारख्या उपक्रमातही पुढाकार घेतला पाहिजे. एखादा वृक्ष लावणे हेच नव्हे तर त्याचे संगोपन करणे ही खरी जबाबदारी आहे. या प्रसंगी मा. डॉ. सुभाष बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), मा. प्रकाश तांबट (उपाध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), मा. डॉ. प्रशांत बोबडे (सचिव, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), मा. अजिंक्य बोबडे (कोषाध्यक्ष,विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), ॲड. अनिल व्यास, श्री. निलेश देशमुख, मंडळाचे पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे, सप्ताह समन्वयक प्रा. डॉ. डी. एन. व्यास, प्रा. डॉ. हनुमंत भोसले, प्रा. डॉ. ए. व्ही. पडघन, प्रा. डॉ. एस. टी. वराळे, प्रा. एन. बी. कुटेमाटे, प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख, प्रा. व्ही. यु. मोरे, प्रा. डॉ. ए. ए. तायडे, प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ, प्रा. डॉ. अनुराग बोबडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button