ट्रेनमध्ये किती सीट रिकाम्या आहेत? आता एका क्लिकवर मिळणार माहिती, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

सणासुदी्च्या दिवसांत ट्रेनला भरपूर गर्दी असते. अशावेळी अनेकांना पहिले टेन्शन येते ते म्हणजे ट्रेनमध्ये सीट मिळणार का? ही माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांना पूर्वी खूप वेळ वाट पाहावी लागायची. ट्रेनच्या कोणत्या कोचमध्ये किती सीट रिकाम्या आहेत याची माहिती लगेचच मिळायची. मात्र आता भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. IRCTC च्या वेबसाइट व मोबाईल अॅपवर असलेल्या Charts / Vacancy फिचरच्या माध्यमातून ट्रेनमध्ये कोणत्या सीट रिकाम्या आहेत व कोणत्या सीटसाठी बुकिंग झाले आहे.
IRCTC वर सीट चेक करण्याची सोप्पी पद्धत
जर तुम्ही ट्र्रेनने प्रवास करत असाल तर हे जाणून घेणे गरजेचे आहे की कोचमध्ये किती सीट रिकाम्या आहेत. त्यामुळं तुम्हाला तिकीट काढण्यास जास्त मेहनत करावी लागणार नाही. फक्त तुम्हाला IRCTCवर वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवरील काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
सगळ्यात पहिले IRCTCच्या वेबसाइट किंवा मोबाईल अॅप ओपन करा.
थोडे स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला Charts / Vacancy चा पर्याय दिसेल.
यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रेन नंबर किंवा प्रवासाची तारिख टाकायची आहे.
तुमची पूर्ण माहिती टाकल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण डिटेल येईल.
यात कोणत्या कोचमध्ये किती सीट बुक आहेत आणि किती सीट रिकाम्या आहेत हे कळेल.
कोणत्या ट्रेनमध्ये या सुविधा मिळणार
सुरुवातीला या सुविधा फक्त प्रमियम ट्रेनमध्येच उपलब्ध होत्या मात्र आता प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा पाहता रेल्वेने सर्व आरक्षित ट्रेनसाठी सुरू केल्या आहेत. तुम्ही राजधानी, शताब्दी, दुरंतो किंवा एखाद्या मेल/एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला हा पर्याय मिळणारच आहे. रेल्वेचा पहिला चार्ट साधारणतः ट्रेन सुटण्याच्या जवळपास 4 तास आधी तयार होतो. तर, दुसरा आणि शेवटचा चार्ट ट्रेन सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी जारी केला जाणार आहे. दोन्ही वेळेला सीटची स्थिती IRCTC अॅप आणि वेबसाइटवर अपडेट केली जाणार आहे.
ही सुविधा प्रवाशांसाठी फारच उपयोगी ठरणार आहे. आता प्रवाशांना कोच निवडण्यासाठी सोप्प होणार आहे. म्हणजे आता कोचमध्ये किती सीट रिकाम्या आहेत. यामुळं प्रवाशांचा वेळ वाचतो आणि ते त्यांच्या सुविधेनुसार सीट बुक करु शकता.
उदाहरणार्थ, जर एखाद्याला तातडीने ट्रेनमध्ये प्रवास करायचा असेल, तर तो कोणत्या डब्यात जागा उपलब्ध आहेत ते तपासू शकतात आणि त्यानुसार तिकिटे बुक करू शकतात. सणांच्या काळात जेव्हा जागांची मागणी जास्त असते तेव्हा हे वैशिष्ट्य अधिक उपयुक्त ठरते.
१. IRCTC चार्ट/व्हॅकन्सी फीचर म्हणजे काय?
हे फीचर भारतीय रेल्वेच्या IRCTC वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध असून, ट्रेनमधील कोणत्या कोचमध्ये किती सीट रिकाम्या आहेत आणि किती बुक झाल्या आहेत याची माहिती देते. हे पहिल्या आणि शेवटच्या चार्टनुसार अपडेट होते.



