Latest News

खरा धक्का: AI मुळे नोकरी गमावण्याचा सर्वाधिक धोका पुरुषांना की महिलांना? रिपोर्ट उघड करतो सत्य!

सध्याच्या युगात तंत्रज्ञानाने वेगाने भरारी घेतलीय. एआय आल्यानंतर जगभरातील विविध क्षेत्रात मोठी क्रांती घडून आलीय. सामान्यांपासून मोठमोठ्या आस्थापनांपर्यंत साऱ्यांचीच कामे सोपी झाली आहेत. परिणामी मोठमोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करु लागल्या आहेत. नोकर कपातीची झळ भारतासह जगभरातील सर्वच कर्मचाऱ्यांना बसतेय. दरम्यान एआयमुळे पुरुष आणि महिलांपैकी कोणाला सर्वाधिक नोकरी जाण्याता धोका आहे? कोणी केलाय हे संशोधन? सविस्तर जाणून घेऊया.

कोणी केलाय रिसर्च?
संयुक्त राष्ट्रांने “जेंडर स्नॅपशॉट 2025” अहवाल जाहीर केलाय. ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयमुळे महिला आणि पुरुषांच्या भविष्यातील नोकऱ्यांवर भाष्य केलंय. या अहवालानुसार येणाऱ्या काळात 28% महिलांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, तर पुरुषांच्या फक्त 21% नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे डिजिटल क्षेत्रातील लैंगिक असमानता आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग केवळ 29% आहे, तर नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये हा आकडा फक्त 14% आहे. ही कमी सहभागिता डिजिटल युगात महिलांसमोरील आव्हान प्रकर्षाने दाखवून देत आहे.

2030 पर्यंत काय होईल?
2025 हे वर्ष शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी (SDGs) निर्णायक आहे, कारण 2030 पर्यंत लिंग समानता साध्य करण्यासाठी फक्त पाच वर्षे शिल्लक आहेत. एआयच्या वाढत्या प्रभावामुळे लिंग समानतेची उद्दिष्टे गाठणे कठीण होऊ शकते, असेही यात नमूद करण्यात आलंय.

बदलाची संधी
आता हा अहवाल ऐकून अनेक महिलांना आपल्या भविष्याची काळजी वाटत असेल. पण थोडं थांबा. एआयची योग्य धोरणे आणि उपाययोजना केल्यास परिस्थिती बदलू शकते, असंही यात म्हटलंय. अहवालानुसार 343 दशलक्ष महिला आणि मुलींना एआयमुळे फायदाही होऊ शकतो, 30 दशलक्ष महिलांना गरिबीतून बाहेर काढता येईल, 42 दशलक्ष कुटुंबांना अन्न सुरक्षा मिळेल आणि जागतिक अर्थव्यवस्थेत 1.5 ट्रिलियन डॉलर्सची वाढ होईल.

कोणती पावले उचलणे आवश्यक?
महिलांच्या नोकऱ्यांचे संरक्षण आणि त्यात समानता सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल आणि तांत्रिक कौशल्यांमध्ये गुंतवणूक, आर्थिक क्षेत्रात सुरक्षित बदल आणि लिंग-संवेदनशील धोरणे लागू करण्याची गरज अहवालात नमूद करण्यात आली आहे. यासाठी तातडीने पावले उचलल्यास डिजिटल युगात महिलांचा सहभाग वाढू शकतो, असंही पुढे म्हटलंय.

एआयमुळे महिलांच्या नोकऱ्यांना पुरुषांच्या तुलनेत जास्त धोका का आहे?
संयुक्त राष्ट्रांच्या “जेंडर स्नॅपशॉट २०२५” अहवालानुसार, एआयमुळे २८% महिलांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, तर पुरुषांच्या फक्त २१% नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग कमी (२९%) आणि नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये त्यांचा वाटा अत्यल्प (१४%) आहे. यामुळे डिजिटल युगात महिलांना नोकरी गमावण्याचा धोका जास्त आहे.

डिजिटल असमानता कमी करण्यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात?
अहवालात सुचवले आहे की, महिलांच्या डिजिटल आणि तांत्रिक कौशल्यांमध्ये गुंतवणूक, विविध आर्थिक क्षेत्रात सुरक्षित बदल सुलभ करणे आणि लिंग-संवेदनशील कामगार व सामाजिक सुरक्षा धोरणे लागू करणे आवश्यक आहे. या उपाययोजनांमुळे डिजिटल युगात महिलांचा सहभाग वाढेल आणि लिंग समानता साध्य होण्यास मदत होईल.

एआयच्या प्रभावामुळे महिलांसाठी कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात?
योग्य धोरणे आणि उपाययोजना केल्यास ३४३ दशलक्ष महिला आणि मुलींना फायदा होऊ शकतो. यामुळे ३० दशलक्ष महिलांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढता येईल, ४२ दशलक्ष कुटुंबांना अन्न सुरक्षा मिळेल आणि जागतिक अर्थव्यवस्थेत १.५ ट्रिलियन डॉलर्सची वाढ होऊ शकते. यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button