अभिनंदन पेंढारी मित्रमंडळा तर्फे पयुर्षण पर्वात उपवास करणाऱ्या जैन धर्मातील श्रावक श्राविकाचा सन्मान

दिगंबर जैन महासमिती व अभिनंदन पेंढारी मित्र मंडळाच्या वतीने पयुर्षण पर्वात उपवास करणाऱ्या जैन धर्मातील बंधु भगिनींचा स्नेहील सत्कार करण्यात येऊन त्यांना प्रोत्साहीत करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन दिगंबर जैन महासमितीचे विदर्भ अध्यक्ष अभिनंदन पेंढारी यांनी केले तर प्रमुख अतिथी दिपक हुंडीकर, प्रा. राधेश्याम यादव, विजय बर्वे, रुपेश नगरनाईक यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आयोजक अभिनंदन पेंढारी यांनी प्रास्ताविकपर भाषणातुन पयुर्षण पर्व हे जैन समाजातील सर्वात मोठे भक्ती, श्रद्धा, तपस्या, आध्यात्मिक यांचे दहा दिवसाचे पर्व आहे व या दहा दिवसातील प्रत्येक दिवसाचे दशलक्षण पर्व हे मानवाला वेगवेगळे तत्वज्ञान देते या पर्वात प्रत्येक श्रावक आस्थेने व श्रद्धेने सहभागी होतो. या दिवसात तप व उपासाचे महत्व असुन तो एक तपसाधनेचा मार्ग आहे यात धर्मप्रेमी दोन दिवस, पाच दिवस, दहा दिवस निर्जला, साखर पाणी घेऊनही आपल्या परीने उपवास करतात या उपवासामुळे मानवाला एक नवीन ऊर्जा प्राप्त होते व उपवासाचे शरीरास होणारे लाभ त्यांनी प्रतिपादन केले. यानंतर उपवास करणाऱ्या मीनाताई भेलांडे, अलकाताई फुलबरकर, अर्चनाताई रोडे, अभिषेक भेलांडे, श्री फुलबरकर यांचे अभिनंदन पेंढारी व उपस्थितांनी मोत्याची माला, पंचरगी जैन दुपट्टा, गुलाब पुष्प, व धार्मिक पुस्तके देऊन यथोचित गौरव केला दिपक हुंडीकर विजय बर्वे, प्रा राधेश्याम यादव, सौ रेखाताई बर्वे यांनी सत्कार मुर्तीनी केलेल्या तपसाधनेचा गौरव करीत समयोचित मार्गदर्शन केले सत्काराला उत्तर देतांना मिनाताई भेलांडे, अल्काताई, अर्चनाताई यांनी उपवास साधनेचे महत्व आपल्या भाषणातुन विषद करीत साधनेतून त्यांना आलेले अनुभव कथन केले जैन धर्माची शिकवण व तत्वज्ञान याबद्दल उपस्थितांना अवगत केले व सत्काराप्रती आभार व्यक्त केले.कार्यकमाचे संचालन अभिनंदन पेंढारी तर आभार सौ मयुरी प्रतिक बर्वे यांनी केले



