AmravatiLatest NewsUncategorized

मा. कामगार मंत्री आकाश दादा फुंडकर यांचा गो. से. महाविद्यालयाच्या वतीने सत्कार

खामगाव : स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारा संचालित गो. से. विज्ञानकला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे 18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर पर्यंत स्वर्गीय भाऊसाहेब बोबडे यांच्या जयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचा गौरव खामगाव शहराचे शिल्पकार म्हणून  केला जातो. माजी नगराध्यक्षमाजी खासदारविदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगावचे माजी अध्यक्षस्व. ॲड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जयंती सप्ताहाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या निमित्ताने महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच सध्या महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार ॲड. आकाशदादा फुंडकर यांचे  मंत्री म्हणून प्रथमच महाविद्यालयात आगमन झाले. या वेळी उपस्थितीत विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ  सर्व  सदस्य व महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा शालश्रीफळपुष्पगुच्छ व मोमेंटो देऊन मा. डॉ. सुभाषजी बोबडे (अध्यक्षविदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव)मा. प्रकाशजी तांबट (उपाध्यक्षविदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव),  मा. डॉ. प्रशांत जी बोबडे (सचिवविदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव)मा. अजिंक्यदादा बोबडे (कोषाध्यक्ष विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव),  मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. सुभाषजी बोबडे होते. यावेळी माजी विद्यार्थी व क्रिकेट कलर कोर्ट होल्डर श्री. निलेशजी देशमुख व त्यांची पत्नी सौ. देशमुख यांचा विशेष सत्कार सचिव डॉ. प्रशांत बोबडे यांनी केला. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश तांबटसचिव डॉ. प्रशांत बोबडेकोषाध्यक्ष अजिंक्य दादा बोबडेमंडळाचे पदाधिकारीउपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळेमहाविद्यालयाचे विभागप्रमुखप्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना मा. नामदार ॲड. आकाश दादा फुंडकर म्हणाले, “मी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. येथे येऊन मला अत्यानंद आनंद झाला. मंत्री झाल्यानंतर मी कोणताही सत्कार स्वीकारलेला नाही. मात्र माझे गुरू व मार्गदर्शक स्व. भाऊसाहेब बोबडे आणि स्व. पांडुरंग फुंडकर यांच्या स्मृतीत हा सत्कार मिळणे माझ्यासाठी विशेष आहे. या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना मा. ना. फुंडकर म्हणाले कीभाऊसाहेबांनी खामगावला गार्डन नगरी म्हणून नाव दिले. नटराज गार्डनजनुना तलाव व टॉवर गार्डन यांना पुनर्जीवित करून आम्ही त्यांच्या स्वप्नातील शहर उभारण्याचा प्रयत्न करत आहो. खामगावच्या विकासात स्वर्गीय भाऊसाहेब बोबडे यांचा मोलाचा वाटा होता .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. हनुमंत भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन सप्ताह समन्वयक प्रा. डॉ. डी. एन. व्यास यांनी मानले. प्रा. डॉ. आर. आर. गव्हाळेप्रा. डॉ. ए. व्ही. पडघनप्रा. डॉ. एस. टी. वराळेप्रा. एन. बी. कुटेमाटेप्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुखप्रा. डॉ. ए. ए. तायडेप्रा. डॉ. डी. टी. अढाऊप्रा. व्ही. यु. मोरेप्रा. डॉ. अनुराग बोबडे,  महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुखप्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारीव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button