AmravatiamravatinewsLatest NewsMaharashtra

भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा च्या वतीने चलो जिते चित्रपटाचे आयोजन

जीवनाला कलाटणी देणारा प्रेरणादायी चित्रपट… डॉक्टर नितीन धांडे…
देशाचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्रीमान नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा अंतर्गत नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चलो जीते या मराठी चित्रपटाचं प्रदर्शन सोबतच सेवा हिरोज यांच्या सत्कार सोहळ्याच आयोजन स्थानिक तापडिया मॉल येथील मिराज थ्री थेटर मध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नितीन जी धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाच्या संयोजिका व भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या उपाध्यक्ष, मा. नगरसेविका माननीय सौ सुरेखाताई लुंगारे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आले होते. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता माननीय श्री शिवराय जी कुलकर्णी ,भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव माननीय श्री जयंत भाऊ डेहनकर,भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष किरण भाऊ पातुरकर, महामंत्री राधाताई कुरिल,माननीय श्री बादल जी कुलकर्णी, युवा मोर्चा अध्यक्ष विकी भैय्या शर्मा थिएटरचे मॅनेजर श्री.सहारे सर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. प्रथम सर्व पाहुण्यांच भाजपा उपाध्यक्ष गंगाताई खारकर, प्राध्यापक संजय तीरथकर, प्राध्यापक रवी भाऊ कोल्हे, प्राध्यापक प्रकाश घाटे ,भाजपा महिला मोर्चा महामंत्री शितलताई वाघमारे, जयाताई माहुरे युवा मोर्चाचे प्रणित सोनी यांनी सिताफळ व पेरूचे रोपटे देऊन आदरपूर्वक सत्कार केला. त्यानंतर मनीबाई गुजराती हायस्कूल अंबापेट अमरावती द्वारा पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तयार केलेलं संस्कृत भाषेतील गीत मणित सरोदे ,अखिल पिंपळकर, दर्शन हटवार, रवनीत जावरकर, अनन्या खरे, पूर्वा पळसापूरे ,शुभ्रा विश्वकर्मा, मंजिरी गिरी, हरीशा अग्रवाल, आधी विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात गाऊन मोदीजींना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर समाजातील खरे हिरो जे आपल्या मुलांना शाळेमध्ये रोज सुखरूप पोहोचवतात व सुरक्षित रित्या घरी परत आणतात. अशा स्कूलबस च्या ड्रायव्हरचा व शाळेमध्ये मुलांची काळजी घेणारे काळजीवाहक म्हणजेच चपराशी यांचा शॉल व सीताफळ चे रोपटे देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये पंचशील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोडणारे स्कूल बस ड्रायव्हर माननीय श्री अमोल वानखेडे व त्याच शाळेमध्ये आपली सेवा देणारे चपराशी माननीय श्री सुदेश टोकसे, सिंधी हिंदू हायस्कूल मध्ये सेवा देणारे श्री मनोहर शांताराम दातेराव ,स्वर्गीय लक्ष्मीकांत पसारकर मूकबधिर विद्यालय येथे सेवा देणारे श्री मुकुंद मारोतराव पकडे, स्कूल बस ड्रायव्हर अब्दुल जाकीर अब्दुल कादर ,गोल्डन किड्स , ज्ञानमाता, होली क्रॉस येथे स्कूल बसने विद्यार्थ्यांना सोडणारे भोजलिंग गौरी अप्पा काळे, मनीबाई गुजराती हायस्कूल अंबापेठ येथे विद्यार्थ्यांना स्कूलबस ने सोडणारे स्कूलबस चालक श्री.शेषराव देशमुख ,शिपाई श्री.गजानन कोकाटे, श्री अजय भट्ट यांचा डॉक्टर नितीनजी धांडे व मान्यवरांच्या हस्ते स्नेहपूर्ण यथोचित सत्कार करून त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करण्यात आला. अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री नितीन धांडे म्हणाले की चलो जिते हा मराठी चित्रपट जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी देणारा प्रेरणादायी चित्रपट आहे .यातून लहान मुलांनी शिकवण घेऊन आपले जीवन समृद्ध करावे. तसेच हा सत्कार प्रातनिधीक स्वरूपाचा असून भारतीय जनता पार्टी सदैव सेवा कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देते असे उद्गार काढले. वरील संपूर्ण कार्यक्रमाच संचलन व आभार या कार्यक्रमाच्या संयोजिका सौ सुरेखाताई लुंगारे यांनी केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते मा. नगरसेविका व शहरातील अनेक पालक आपल्या पाल्यांसोबत उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button