450 किलोचा जीवंत बॉम्ब सापडला; खोदकामात उडाला खळबळजनक शोध!

जगातील एक अतिशय वर्दळीचं आणि गर्दीचं शहर एका अशा वस्तूमुळं रिकामं करण्यात आलं ज्या वस्तूनं सर्वांनाच धडकी भरली. हाँगकाँगमध्ये ही घटना घडली असून, एका निर्माणाधीन इमारतीच्या खोदकामादरम्यान जवळपास 100 वर्षांपूर्वीचा दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब सापडला असून, तो पाहताच बऱ्याचजणांना धडकी भरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार या बॉम्बचं वजन 450 किलो असून, त्याची लांबी 1.5 मीटर इतकी सांगण्यात येत आहे. संरक्षण दलांनी हा हा बॉम्ब अतिशय घातल असल्याचं सांगत तातडीनं त्याची विल्हेवाट लावण्याचं काम हाती घेण्यात आलं. बॉम्ब सापडल्याचं वृत्त समोर येताच तातडीनं यंत्रणांनी बचावकार्य हाती घेत हे शहर आणि नजीकचा परिसर रिकामा करून घेतला. ज्यानंतर 6000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलं.
18 हून अधिक इमारती तातडीनं रिकाम्या करण्यात आल्या आणि दारोदारी जाऊन कोणीही व्यक्ती मागे राहणार नाही याची पुन:पडताळणीसुद्धा केली. या एका बॉम्बमुळं स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान हाँगकाँग पोलिसांच्या माहितीनुसार बॉम्ब नष्ट करण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्याचा स्फोट होण्याचाही धोका असतो. ज्यामुळं या पथकाला प्रचंड साधवगिरीनं हे काम करावं लागलं.
विश्वयुद्धासमयीचे बॉम्ब आजही प्रचंड धोक्याचे…
हाँगकाँगच नव्हे, तर जगाच्या बऱ्याच भागांमध्ये स्फोट न झालेले बरेच जिवंत बॉम्ब आजही मोठा धोका निर्माण करत आहेत. जून 2025 मध्ये जर्मनीमध्ये याच युद्धकाळातील तीन बॉम्ब सापडले होते. ज्यामुळं 20000 नागरिकांना सुरक्षित स्थळी तताडीनं स्थलांतरित करण्यात आलं होतं. युरोपच्या डायचे वेलेच्या अहवालानुसार WWII चे बॉम्ब आजही एक मोठं संकट ठरत असून, आशियाई भागात व्हिएतनाम, लाओस यांच्यासह गाझा, युक्रेन यांसारख्या भागांमध्ये जमिनीत दडलेली ही विध्वंसक स्फोटकं अनेकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत.
हाँगकाँगमध्ये कोणत्या प्रकारचा बॉम्ब सापडला?
हाँगकाँगमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील 450 किलो वजनाचा आणि 1.5 मीटर लांबीचा बॉम्ब सापडला. हा बॉम्ब एका निर्माणाधीन इमारतीच्या खोदकामादरम्यान आढळला.
बॉम्ब सापडल्यानंतर काय कारवाई करण्यात आली?
बॉम्ब सापडताच संरक्षण दलांनी आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. परिसर रिकामा करण्यात आला, 18 हून अधिक इमारती रिकाम्या केल्या गेल्या आणि 6000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. बॉम्ब नष्ट करण्याचं काम अत्यंत सावधगिरीने हाती घेण्यात आलं.
हा बॉम्ब किती धोकादायक होता?
हाँगकाँग पोलिसांच्या माहितीनुसार, हा बॉम्ब अत्यंत घातक होता आणि त्याचा स्फोट होण्याचा धोका होता. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावताना विशेष काळजी घ्यावी लागली.



