AmravatiLatest News

स्व. ॲड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात स्व. ॲड. शंकररावजी उर्फ भाऊसाहेब बोबडे यांच्या जयंती उत्सव 2025 निमित्त बुधवार, दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. व्ही. उबाळे तसेच जयंती उत्सव समन्वयक डॉ. व्यास यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) व राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून परिसर स्वच्छतेचे व्रत हाती घेतले. या अभियानात प्लास्टिक कचरा व पॉलिथिन पिशव्या गोळा करण्यात आल्या तसेच गाजरगवत निर्मूलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. विद्यार्थ्यांनी श्रमदानातून स्वच्छतेचा आदर्श घालून दिला. सामाजिक कार्यामध्ये सातत्याने राबविल्या जाणाऱ्या अशा उपक्रमांमुळे गो. से. महाविद्यालयाची कार्यशैली कौतुकास्पद ठरत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब बोबडे, सचिव डॉ. प्रशांतजी बोबडे, संचालक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तळवणकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. अढाऊ, प्रा. वाघ, प्रा. कायपेल्लीवार, डॉ. नीता बोचे, प्रा. खंदारे, प्रा. पिढेकर, डॉ. रोहिणी धरमकार, प्रा. मोरे, प्रा. भुतेकर,  डॉ. टकले, डॉ. तातेड, प्रा. फाटे, प्रा. सिडाम, प्रा. म्हैसागर, प्रा. ठेंग, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी  यांचे विशेष सहकार्य लाभले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button