गो. से. महाविद्यालयात हिंदी काव्य वाचन स्पर्धा संपन्न

गो. से. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे हिंदी विभागाद्वारे हिंदी पखवाडा निमित्त घेण्यात यारा येणारे कार्यक्रमापैकी आज दिनांक 16/09/2025 रोजी हिंदी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये उद्घाटक म्हणून लाभलेल्या निसर्ग ग्रुप खामगाव यांच्या अध्यक्ष श्रीमती. निताताई बोबडे, मा. हितेश सोनी तसेच महाविद्यालयाची उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. शेखर खडसे यांनी केले त्यामध्ये यांनी हिंदी कशाप्रकारे उपयोगी आहे तसेच हिंदीची महत्त्व सोबतच हिंदीचा स्पर्धा परीक्षांमध्ये कशाप्रकारे योगदान आहे यांचं महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर महाविद्यालयाची उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे यांनी कविता कशाप्रकारे महत्त्वाचे आहे कविता कशी असावी विद्यार्थ्यांनी कविता का लिहावी आपला साहित्य कडे कल कसा असावा इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमती. नीताताई बोबडे यांनी जीवनात साहित्याचे महत्त्व तसेच कविता कशा असाव्या कविता सोबत निसर्ग कसा असावा आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले तसेच आपल्या जीवनामध्ये निसर्गाचा काय महत्त्व आहे त्यांनी आपल्या कविताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितले उदाहरणार्थ निसर्गाकडे कुठलाही ब्रश नसताना वेगवेगळ्या प्रकारचे फुल कशी निर्माण करतात त्यांचा रंग कसा असतो इत्यादी बाबीवर त्यांनी मार्गदर्शन केले, सोबतच खामगाव चे कवी श्री. हितेश सोनी यांनी आपल्या हास्य व्यंगच्या विनोदाच्या शैलीमध्ये कविता विद्यार्थ्यांसमोर ठेवल्या कविता का लिहाव्या का वाचाव्या याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्या विद्यार्थ्यांनी अनेक विषयावर आपल्या कविता वाचल्या त्यामध्ये त्यांचे विषय देशभक्ती निसर्ग सध्याची परिस्थिती इत्यादी विषयावर कविता साजरा केल्या. या कार्यक्रमाचे आयोजन हिंदी विभागाची डॉ. भारत जवंजाळ यांनी केले ह्या कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनिता कौर कामठेकर यांनी केले या कार्यक्रमांमध्ये प्रा. डॉ विक्रम मोरे, डॉ. एम. आर. देशमुख, प्रा. भुतेकर, प्रा.टकले सर, प्रा. देवानंद आढाव, प्रा. दीपक नागरीक, प्रा. पूनम तिवारी, प्रा. पूजा टेकाळे, उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



