Latest NewsMaharashtra

खल्लार-चंद्रपूर परिसरात ढगफुटी सदृश पाऊस, घरात ४ फूट पाणी

दर्यापूर –र्यापूर तालुक्यातील खल्लार-चंद्रपूर परिसरात आज दुपारी तब्बल एक तास मुसळधार पावसाने कहर केला. या मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरांमध्ये, शाळेत, ग्रामपंचायतीत पाणी शिरले. ग्रामपंचायत शेजारील अविनाश दहाट यांच्या घरात तर तीन ते चार फूट उंचीपर्यंत पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या पाण्यात घरातील धान्यसाठा, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि सर्वच जीवनावश्यक साहित्य भिजले. सर्वात मोठा फटका बसला तो शेतासाठी साठवून ठेवलेल्या हरभऱ्याच्या बियाण्यांना. पूर्ण बियाणे पाण्याखाली आल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
पावसाच्या या तडाख्यामुळे परिसरातील शेतकरी देखील चिंतेत आहेत कारण उभ्या पिकांचेही नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button