अमरावती मनपा निवडणूक: काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; प्रभागनिहाय निरीक्षक नियुक्त, पक्षप्रवेशाला वेग

अमरावती 17 सप्टेंबर 2025 – येणाऱ्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली रणनिती ठरवण्यास आणि संघटना मजबूत करण्यास जोरदार सुरुवात केली आहे. काँग्रेस भवन, अमरावती येथे मंगळवारी (16 ऑगस्ट) अमरावती आणि बडनेरा विधानसभा प्रभारी डॉ. झिशान हुसैन यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीला खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, किशोर बोरकर, आसिफ तवक्कल, जयश्री वानखडे, अब्दुल रफीक पत्रकार, फिरोज शाह, वैभव देशमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभागनिहाय निरीक्षकांची नियुक्ती
महानगरपालिकेच्या विविध प्रभागांत काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क, संघटन आणि निवडणूक व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी प्रभागनिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये अविनाश पांडे, बबलु देशमुख, कोमल बोथरा, विनोद मोदी, अशोक डोंगरे, संजय वाघ, किशोर बोरकर, नाना बारबुद्धे, नेमराज देशमुख, मोहम्मद साबीर, सुरेश इंगळे आदींचा समावेश आहे.
पक्षप्रवेशाचा मोठा लाट
या बैठकीत शेकडो नव्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
प्रमुख नावांमध्ये:
- उपाध्यक्ष: मोहम्मद शारीक परवेज
- महासचिव: डॉ. फिरोज खान, रेहान अली, ॲड. अफरोज खान
- सचिव: अब्दुल शकील, सय्यद बासित, रेहान खान, शेख सलीम
- युवक काँग्रेस: प्रफुल्ल तांतरपाळे, गोविंद ठाकरे
रणनितीचा संकल्प
बैठकीत काँग्रेस नेत्यांनी प्रभागनिहाय संपर्क वाढवणे, नागरिकांच्या समस्या समजून घेणे आणि पक्षाच्या विकासनितीचा प्रचार करणे यावर भर देण्याचे ठरवले.
डॉ. झिशान हुसैन यांनी सांगितले, “काँग्रेस पक्ष हा सामान्य माणसाचा पक्ष आहे. अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
खासदार वानखडे, डॉ. देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी एकजूट, संघटन आणि नियोजनबद्ध कामगिरीचे महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीम मिरावाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनोद मोदी यांनी व्यक्त केले.
शहरभरून शेकडो मान्यवरांची उपस्थिती
बैठकीस वंदना कंगाले, देवयानी कुर्वे, अफरोज खान, किशोर पाटील, जावेद साबीर, डॉ. मतीन अहमद, अनिकेत क्षीरसागर, गजानन खडसे यांच्यासह शेकडो मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



