AmravatiLatest NewsMaharashtra
अलायन्स एयरच्या मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल; प्रवाशांसाठी आता अधिक सोयीचे वेळा

अलायन्स एयरच्या मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल; प्रवाशांसाठी आता अधिक सोयीचे वेळा
मुंबई १६ सप्टेंबर – अलायन्स एयर विमान सेवा कंपनीने ऑक्टोबर महिन्यापासून मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल केले असून हे नवीन वेळापत्रक प्रवाशांसाठी अधिक सोयीचे ठरणार आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, मुंबईहून अमरावतीकडे जाणारे विमान सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि ते सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी अमरावती येथे पोहोचेल.
अमरावतीहून परतीचे विमान सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी उड्डाण करेल आणि सकाळी ११ वाजता मुंबईत पोहोचेल.
सध्या आठवड्यातून केवळ तीन दिवस ही सेवा उपलब्ध आहे. मात्र, लवकरच ही सेवा आठवड्यातून चार दिवस सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळत आहे. या बदलामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.



