AmravatiLatest NewsMaharashtra
विद्यापीठात ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांची जयंती उत्साहात साजरी

अमरावती – ( दि. 14.09.2025)
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्र येथे ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. संचालन व ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली. जयंती कार्यक्रमाला डॉ. श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. संदीप जोशी तसेच विद्यापीठातील कर्मचारी उपस्थित होते.



