Accident NewsLatest NewsMaharashtraNanded

नांदेडमध्ये भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू

ही घटना नांदेड जिल्ह्यातील भोकर ते बारड रस्त्यावर, बारसगाव पाटीजवळ रात्रीच्या सुमारास घडली. रस्त्याच्या कडेला एक ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता. याच ट्रकला भरधाव वेगात येणाऱ्या पल्सर दुचाकीने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. रात्रीच्या वेळी रस्त्यावर योग्य प्रकारे सूचनाचिन्हं न लावता उभ्या असलेल्या ट्रकममुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दोन्ही तरुण मित्र होते आणि त्यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button