India NewsLatest News

ओडिशा : ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत शुक्रवारी रात्री विद्यार्थी वसतिगृहात झोपले असताना काही वर्गमित्रांनी ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोळे चिकटले. डोळे चिकटवल्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी डोळे उघडताच आले नाहीत. त्यानंतर त्यांना आधी गोछापाडा रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर चांगल्या उपचारांसाठी फुलबनी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. एक विद्यार्थ्याची तब्बेत बरी असून इतर सात जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, फेविक्विकमुळे डोळ्यांचे खूप नुकसान झाले आहे. या घटनेनंतर, जिल्हा प्रशासनाने शाळेचे मुख्याध्यापक मनोरंजन साहू यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत फेविक्विक का टाकण्यात आले हे शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुलांची चौकशी सुरू केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button