AmravatiLatest NewsMaharashtra

अर्जुन नगर भागात विकास योजनेच्या ९२ लक्ष निधीतून पायाभूत सुविधा कामांचा झंझावात

अमरावती (प्रतिनिधी )दिनांक -१४ सप्टेंबर :- अमरावती महापालिका क्षेत्रातील अर्जुन नगर भागात वाढत्या रहिवासी क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याला घेऊन आमदार – सौ. सुलभाताई खोडके यांनी सातत्यपूर्ण विकास कामांची मालिकाच राबविली आहे. या अंतर्गत प्रभागात विविध ठिकाणी एकंदरीत ९२ लक्ष निधीतून पायाभूत सुविधांच्या विकासकामांचे भूमिपूजन आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. या अंतर्गत अर्जुन नगर भागातील अशोक कॉलनी येथील मनपाच्या खुल्या जागेवर सभागृहाचे बांधकाम करणे, अशोक कॉलनी येथील मनपाच्या ओपन स्पेसला चेनलींक-फेन्सिंग करणे, सहजानंद नगर मधील विजय पांडे ते फुलेकर यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे, अर्जुन नगर येथील प्रीमियर शाळा ते निलेश जवंजाळ यांच्या घरापर्यंत तसेच मनपाच्या खुल्या मैदानाच्या सभोवताल रस्त्याचे बांधकाम करणे,अशी कामे करण्यात येत आहे. यावेळी आमदार महोदयांनी कुदळ मारीत व नामफलकाचे अनावरण करीत भूमिपूजनची औपचारिकता साधली.
शहराचा झपाट्याने विस्तार होत असून नागरिकांना पायाभूत सुविधांची नितांत गरज आहे. यासाठी मिळालेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन शासनाकडून नागरी सुविधांच्या कामासाठी भरीव निधी मंजूर करून आणला आहे. या अंतर्गत प्रभागा-प्रभागामध्ये विकास कामांचे नियोजन करून रस्ते, नाली बांधकाम, महापालिकेच्या सार्वजनिक जागेला चेनलींक-फेन्सिंग करणे तसेच सौंदर्यीकरणाची कामे पूर्णत्वास आणली जात आहे. जनतेच्या अपेक्षेनुरूप शाश्वत विकासाला गती देऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विकासाची मालिकाच राबविण्यावर आपला सातत्यपूर्ण भर असल्याचे प्रतिपादन आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी केले. स्थानिक रहिवाशी भागात विविध समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. निवडणूकपूर्व काळात आपल्या जनाशीर्वाद यात्रेच्या वेळी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी सदर भागात झंजावाती दौरा केला असता,स्थानिक नागरिकांनी त्यांना विविध समस्यांबाबत अवगत केले होते. त्यामुळे निवडून येताच आमदार महोदयांनी सदर भागातील कामांना प्राथमिकता देवून निधी उपलब्ध करून दिला. याबद्दल स्थानिक नागरिकांनी आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा सत्कार केला. तसेच अमरावती शहराच्या सामाजिक ,सांस्कृतिक, क्रीडा विकासासाठी पुढाकार घेवून विविध उपक्रमांच्या आयोजनात अग्रणी असलेले श्री. यश संजय खोडके यांचा सुद्धा स्थानिक शिष्टमंडळ व युवक बांधवांच्या वतीने विशेषत्वाने सत्कार करण्यात आला. दरम्यान आमदार महोदयांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या निवेदनाच्या स्वीकार केला. गतकाळात आमदार महोदयांच्या पुढाकाराने शहराचे चित्र पालटले असून विकासपर्व नांदताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळातही आमची सुलभाताईंना साथ राहणार असल्याचा निर्धार अर्जुन नगर -अशोक कॉलनीवासीयांनी व्यक्त केला. यावेळी प्रभाग क्रमांक १ शेंगाव – राहांटगांव मधील प्रमुख पदाधिकारी व सहकारी तसेच अर्जुन नगर भागातील स्थानिक नागरिक व महिला भगिनी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button