AmravatiLatest News

अमरावती रिंग रोडवर घनकचऱ्याविरोधात भजन आंदोलन

आज सकाळी 9 वाजतापासून अमरावतीमधील रिंग रोड पूर्णपणे ठप्प झाला होता. याचं कारण होतं परिसरातील नागरिकांचं भजन आंदोलन. गजानन माऊली कॉलनी, महालक्ष्मी अपार्टमेंट, गोल्डन लिफ्ट मॅरेज हॉल आणि महात्मा ज्योतिबा फुले कॉलनी अशा अनेक भागांतील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. अनेक दिवसांपासून रिंग रोडच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात घनकचरा साचलेला आहे. कंपल डेपो नसतानाही बेकायदेशीरपणे इथे कचरा टाकला जात असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत होता.

याच त्रासाला कंटाळून नागरिकांनी आज अनोख्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला. त्यांनी हातात टाळ-चिपळ्या घेऊन भजन म्हणत चक्काजाम केला. आंदोलन सुरू होताच माजी नगरसेवक प्रदीप बाजीराव आणि काँग्रेस नेते मिलिंद चिमोटे हेही घटनास्थळी पोहोचले. घाडगे नगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पधरे मॅडम यांनीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी व्हॅनही मागवली, पण पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी आपलं आंदोलन थांबवलं नाही. जोपर्यंत कचरा उचलला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button