Latest NewsMaharashtraNanded

हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाची एसटी आरक्षणाची मागणी

हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झालेला आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तहसीलवर बंजारा समाजाने मोठा मोर्चा काढला. या मोर्चात बंजारा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्य सरकारने नुकताच मराठा आरक्षणासंदर्भात जीआर काढला आहे. हैदराबाद गॅजेटनुसार हा निर्णय घेतला गेल्याचा दावा बंजारा समाजाने केला असून त्याच गॅजेटमध्ये बंजारा समाजाची नोंद आदिवासी म्हणून असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
म्हणूनच महाराष्ट्रात देखील हैदराबाद गॅजेट लागू करून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात सामावून घ्यावे अशी त्यांची मागणी आहे.
बंजारा समाजाने 17 सप्टेंबरपर्यंत आपला निर्णय जाहीर करण्यासाठी राज्य सरकारला मुदत दिली असून त्यानंतरही मागणी मान्य झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मोर्चा शांततेत पार पडला असून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चामुळे भोकर तालुक्यात वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button