MaharashtraVidarbh Samachar

विदर्भाच्या स्वतंत्र राज्याची मागणी पुन्हा जोर धरली

“मागील अनेक वर्षांपासून विदर्भासाठी स्वतंत्र राज्याची मागणी होत आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आज पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी, विधानसभेचे माजी सभापती आणि माजी आमदार वामनराव चटप यांनी राज्य सरकारला मोठं आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. वामनराव चटप यांच्या मते, विदर्भातून राज्याला मोठा महसूल मिळत असला तरी विदर्भाच्या विकासाकडे लक्ष दिलं जात नाही आणि त्यामुळे विदर्भातील लोक आजही विकासापासून वंचित आहेत. विदर्भ वेगळा झाल्यानंतरच विदर्भाचा सर्वांगीण विकास होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button