Latest News

वाघाची मावशी अखेर सापडली! भारतात प्रथमच ‘पल्ला मांजर’अरुणाचल मध्ये कॅमेऱ्यात कैद

ईटानगर : भारताच्या जैवविविधतेच्या नकाशावर एक नवा आणि दुर्मीळ प्राणी नुकताच समोर आला आहे. अरुणाचल प्रदेशमधील दुर्गम पर्वतीय भागात ‘पल्ला मांजर’ (Otocolobus manul) प्रथमच कॅमेऱ्यात कैद झाली असून, ही घटना देशाच्या वन्यजीव अभ्यासात ऐतिहासिक ठरत आहे.

WWF-India च्या सर्वेक्षणातून ऐतिहासिक शोध

WWF-India आणि अरुणाचल वन विभागाच्या संयुक्त वन्यजीव सर्वेक्षण मोहिमेत ही दुर्मीळ मांजर पश्चिम केमांग आणि तवांग जिल्ह्यातील 2000 चौरस किमीच्या दुर्गम भागात आढळली. तब्बल 8 महिन्यांच्या कॅमेरा ट्रॅप सर्वेक्षणादरम्यान, तिचं छायाचित्र टिपण्यात यश आलं.

अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी स्वतः सोशल मीडियावर या मांजरीचे फोटो शेअर करत, अभिमान व्यक्त केला. अनेकांनी तिला “वाघाची मावशी” अशी गंमतीशीर उपाधीही दिली आहे.

पल्ला मांजरीची खास वैशिष्ट्यं

वैज्ञानिक नाव: Otocolobus manul

रचना: लहान पाय, अतिशय दाट केसाळ फर

शेपटी: लांब व झुबकेदार, थंडीत पंज्यांना उब देते

वास्तव्य: दिवसा खडकांमध्ये लपते, सायंकाळी शिकार करते

आवाज: मांजरीसारखा नाही; एखाद्या लहान श्वानासारखा वाटतो

निवास: मुख्यतः खडकाळ, उंच ठिकाणी; 4200 मीटरपेक्षा अधिक उंचीवर

भारतात प्रथमच आढळली ही प्रजाती

पल्ला मांजर ही प्रजाती पूर्वी मंगोलिया, मध्य आशिया, तिबेट वगैरे भागात आढळत होती. भारतात यापूर्वी तिचं अस्तित्व केवळ शक्यतेच्या आधारावर सांगितलं जायचं. मात्र, अरुणाचल प्रदेशात पहिल्यांदाच तिचं अधिकृत छायाचित्र मिळालं आहे.

सर्वेक्षणात आढळले इतरही दुर्मीळ प्राणी

या सर्वेक्षणामध्ये केवळ पल्ला मांजरच नव्हे, तर:

संगमरवरी मांजर (Marbled cat)

हिमबिबट्या (Snow leopard)

ढगाळ बिबटा (Clouded leopard)

यासारख्या अनेक दुर्मीळ प्रजाती देखील कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. त्यामुळे अरुणाचल प्रदेश आता वन्य मांजरींचं हॉटस्पॉट ठरत असल्याचं मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत.

पल्ला मांजरचं संरक्षण आवश्यक का?

IUCN दर्जा: Least Concern

पण…

भारतात ती फारच कमी दिसते, आणि हिमालयातील हवामान बदलांमुळे तिच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो आहे.

त्यामुळे स्थानिक पातळीवर संरक्षण धोरणांची गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button