MaharashtraYavatmal

मुख्यमंत्र्यांचा दौरा यवतमाळ, प्रशासनाची जोरदार तयारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी जोरात सुरू आहे. यवतमाळमधील समता मैदानात शासकीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करताना प्रशासन सतत व्यस्त आहे.

दर दोन दिवसांपासून सततधार पावसामुळे समता मैदान चिखलात बुडाले आहे. मात्र प्रशासनाने भव्य मंडप उभारले असून नागरिकांसाठी बसण्याची सोय करण्यासाठी चुरी आणि मुरूम टाकून मैदान सुखवण्याचे काम सुरु केले आहे. कार्यक्रमस्थळी कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी अधिकारी तळ ठोकून तयारी करत आहेत. पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली, तरीही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर पावसाचं सावट कायम राहणार आहे.

यापूर्वीही मुख्यमंत्र्यांचा यवतमाळ जिल्हा दौरा पावसामुळे रद्द करण्यात आलेला होता, त्यामुळे प्रशासन विशेष दक्षता घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा यवतमाळसाठी महत्वाचा असून, प्रशासन, स्थानिक अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणा सर्वजण कार्यरत आहेत. कार्यक्रमात सरकारी योजना, विकास प्रकल्प आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित विविध मुद्यांवर मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button