MaharashtraNanded

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर

नांदेड – नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, रस्ते आणि घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची शेतीची पिके पाण्याखाली गेली आहेत, शेतजमीन खरडून गेली असून मोठ्या प्रमाणावर कृषी नुकसान झाले आहे. अनेक रस्ते वाहून गेले आहेत, पूल तुटले आहेत, काही गावे संपर्कविहीन झाली आहेत. ग्रामीण भागात घरांचे छप्पर कोसळून नागरिक बेघर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि नुकसानग्रस्त भागाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. शेतकरी आणि सामान्य नागरिकांना मोठा धीर देत त्यांनी राज्य शासनाने तातडीने नांदेड जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करावे अशी मागणी केली आहे. रस्ते आणि घरं पुन्हा उभारण्यासाठी, शेतीचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी हे पॅकेज अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नांदेड जिल्ह्यातील ही परिस्थिती गंभीर असल्याने सर्वच स्तरावरून प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी आणि नागरिक व्यक्त करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button