Maharashtra

जनावरे चारताना पाय घसरला; नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर – गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशनजवळील सनव शिवारात जनावरे चारताना एका तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आकिब अनिश शेख (वय १८, रा. सनव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो दररोजप्रमाणे गुरे चारण्यासाठी शिवना नदी परिसरात गेला होता. जनावरांना हाकलताना त्याचा पाय घसरून तोल गेला आणि तो नदीत पडला.

पाण्याच्या प्रवाहामुळे आकिबला बाहेर येता आले नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. काही पोहण्यात तरबेज तरुणांनी नदीत उडी घेऊन आकिबचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. दरम्यान, शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सलिम चाऊस आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button