Latest News

कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! आरोग्यावर गदा आणणारा नवा अहवाल जाहीर

कॉर्पोरेट जगतातील कर्मचाऱ्यांसाठी एक धोक्याची घंटा ठरू शकणारा आरोग्य अहवाल समोर आला आहे. 9 ते 6, 10 ते 7 अशी नोकरीच्या वेळांमध्ये अडकलेल्या व्यावसायिकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाच वेळ मिळत नाही आणि याचे गंभीर परिणाम आता प्रकर्षाने दिसू लागले आहेत.

‘कॉर्पोरेट इंडिया हेल्थ स्क्रिनिंग’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात, भारतातील कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांमध्ये मधुमेह (Diabetes) आणि पूर्व मधुमेह (Pre-Diabetes) यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरोग्याची धोक्याची पातळी गाठली

सर्वेक्षणात देशभरातील 31 ते 50 वयोगटातील लाखो कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 2023-24 या काळात:

7.89% कर्मचारी मधुमेहग्रस्त

19.38% कर्मचारी पूर्व मधुमेहग्रस्त

मात्र 2024-25 मध्ये हेच आकडे वाढून झाले:

मधुमेहग्रस्त – 7.43%

पूर्व मधुमेहग्रस्त – 24.40%

म्हणजे जवळपास प्रत्येक चौथा कर्मचारी पूर्व मधुमेहाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे.

पुरुष कर्मचारी अधिक धोक्यात

पुरुष कर्मचाऱ्यांमध्ये महिलांच्या तुलनेत हा धोका अधिक वाढताना दिसतोय:

मधुमेह: 6.76% → 7.43%

पूर्व मधुमेह: 14.64% → 18.11%

महिलांमध्येही वाढ झाली असली, तरी ती तुलनेने थोडी कमी आहे:

मधुमेह: 1.13% → 1.42%

पूर्व मधुमेह: 4.47% → 6.29%

चुकीची जीवनशैली ठरतेय कारणीभूत

नोकरदार वर्गाकडून वेळेअभावी बाहेरचं खाणं, जंक फूडचं वाढलेलं सेवन, तणावपूर्ण कामाचा भार, शारीरिक हालचालींचा अभाव – या सगळ्या गोष्टी आजारीपणाचं मुख्य कारण ठरत आहेत.

काय करायला हवं?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा धोका टाळायचा असेल तर खालील गोष्टी अंगिकारायला हव्यात:

नियमित आरोग्य तपासणी

संतुलित आहार आणि घरचं अन्न

दररोज किमान 30 मिनिटांची शारीरिक क्रिया

पुरेशी झोप आणि तणावमुक्ती

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button