AkolaLatest NewsMaharashtra

अकोल्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात जनआक्रोश

अकोला शहर हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आज जनआक्रोश उसळला. अवघ्या पाच दिवसांत आरोपीला अकोला जिल्हा गुन्हा शाखेच्या पथकाने इंदोर येथून अटक केली असली, तरी आज दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा शहरातील राज राजेश्वर मंदिर परिसरातून निघाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. महिलांसह तरुण, ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या मोर्चात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपीस कठोर शिक्षा द्यावी, सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात व्हावी, अशी मागणी केली.
अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या”, “न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. समाजातील प्रत्येक घटकाने आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, प्रकरणाची सुनावणी जलदगतीने करण्याची मागणी केली. त्यांनी स्पष्ट केले की अशा संवेदनशील प्रकरणात गुन्हेगारांना कोणतीही शिथिलता न दाखवता कठोर शिक्षा झाल्यासच समाजात कायद्याची भीती निर्माण होईल.
दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत मोर्चा शांततेत पार पाडला. मात्र शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांकडून दोषीला फास्टट्रॅक कोर्टात शिक्षा मिळावी यासाठी सातत्याने मागणी केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button