Latest NewsMaharashtra

मातोश्रीचा माजी विश्वासू चंपासिंह थापा शिंदे गटात, 30 वर्षांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह?

मुंबई : नेपाळमधील अस्थिर राजकीय परिस्थिती आणि तरुणांचा सरकारविरोधी उद्रेक जगभरात चर्चेत असतानाच, महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध नेपाळी व्यक्तीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तो नाव आहे – चंपासिंह थापा, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी. याच नेपाळी व्यक्तीमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू तयार झाला आहे.

कोण आहेत चंपासिंह थापा?

नेपाळमधून मुंबईत आलेल्या चंपासिंह थापा यांनी तब्बल 30 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली.
ते फक्त सहाय्यक नव्हते, तर ‘बाळासाहेबांची सावली’ म्हणून ओळखले जायचे. बाळासाहेबांचे जेवण, औषधं, दिनचर्या, तब्येतीची काळजी – हे सगळं त्यांनी स्वतःच्या कुटुंबापेक्षा जास्त निष्ठेनं सांभाळलं.

ठाकरे कुटुंबासोबत ३ दशकांचा प्रवास

1985 साली गोरेगावात छोट्या-मोठ्या कामांवर पोट भरणाऱ्या थापांना भांडूपचे तत्कालीन नगरसेवक के. टी. थापा यांनी मातोश्रीवर नेले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘द्रष्ट्या नजरे’नं थापांची निष्ठा ओळखली आणि त्यानंतर ते मातोश्रीचा अविभाज्य भाग झाले.

त्यांचं स्वतःचं कुटुंब नेपाळमध्ये राहत असलं तरी, थापा वर्षानुवर्षे मातोश्रीवरच राहिले. बाळासाहेबांच्या खोलीशेजारीच त्यांची लहानशी खोली होती.

चर्चेत आलं निर्णय – ‘शिंदे गटात’ प्रवेश

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्ष फुटला, आणि अनेक जुने शिवसैनिक दोन गटांत विभागले गेले.
पण या सगळ्यांमध्ये सर्वाधिक धक्कादायक निर्णय घेतला तो चंपासिंह थापांनी. बाळासाहेबांची सेवा केलेल्या थापांनी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात प्रवेश केला.

हा निर्णय मातोश्रीसाठी एक भावनिक धक्का होता. बाळासाहेबांचे अतिशय जवळचे व्यक्ती आता शिंदे गटात जाऊन ठाकरे गटाच्या विरोधात उभे राहिले, यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

सोशल मीडियावर चर्चा रंगली

सध्या नेपाळमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर थापांचं नेपाळी मूळ, त्यांचा महाराष्ट्रातील प्रवास, आणि राजकीय भूमिका यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
‘महाराष्ट्रातील सर्वात फेमस नेपाळी कोण?’ या प्रश्नावर चंपासिंह थापांचं नाव अगदी सहज समोर येतं.

१. चंपासिंह थापा कोण आहेत?
➤ नेपाळमधून आलेले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 27 वर्षे वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम केलेले व्यक्ती.

२. बाळासाहेबांशी काय नातं होतं?
➤ बाळासाहेबांच्या प्रत्येक गरजेसाठी ते कायम सावलीसारखे उपस्थित. त्यांचं जेवण, औषधं, दिनक्रम त्यांनीच सांभाळला.

३. शिंदे गटात का गेले?
➤ बाळासाहेबांनंतर शिवसेना फुटल्यानंतर, थापा यांनी उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला – ज्यामुळे ते चर्चेत आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button