Latest News

बहिणींना आनंदाची बातमी – ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. सामाजिक न्याय विभागानं तब्बल 344.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला वर्ग करण्याचा महत्त्वाचा शासन निर्णय 9 सप्टेंबरला जारी केला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या लाभ वितरणाची पहिली मोठी पायरी पूर्ण झाली आहे.

💰 13 हप्त्यांनंतर ऑगस्ट हप्ता लवकरच

महायुती सरकारनं जुलै 2024 पासून सुरु केलेल्या या योजनेत आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 13 हप्त्यांची रक्कम जमा झाली आहे. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात, तर पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 500 रुपये दिले जातात.

🏠 26 लाख बहिणींची गृहचौकशीही सुरू

दरम्यान, महिला व बाल विकास विभागाकडून 26 लाख महिलांची गृहचौकशी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो, परंतु जर तीन महिला लाभ घेत असतील तर त्यापैकी एका महिलेचा लाभ बंद होणार आहे.

🔜 पुढचा टप्पा – वितरणाची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा

344 कोटींचा निधी वर्ग झाल्यामुळे आता राज्य सरकार किंवा महिला व बाल विकास विभागाकडून ऑगस्ट हप्ता वितरित करण्याची तारीख आणि सविस्तर माहिती कधीही जाहीर होऊ शकते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button