Latest News
आमडी गावात पाय आणि तोंडाच्या आजाराचा कहर, ९ दिवसांत ८ म्हशींचा मृत्यू

नागपूर-रामटेक राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर असलेल्या आमडी गावात सध्या शोककळा पसरली आहे. गावात पसरलेल्या पाय आणि तोंडाच्या आजाराने (Foot and Mouth Disease) शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. गेल्या ९ दिवसांत एकाच शेतकऱ्याच्या ८ म्हशींचा या आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या संकटाने बाधित शेतकरी हतबल झाला आहे. याबद्दल ग्रामपंचायतीने पारशिवनी पंचायत समितीला पत्रव्यवहार करून मदत मागितली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. या गावात वर्षभरापासून कोणताही पशुवैद्यकीय डॉक्टर नाही. त्यामुळे खाजगी डॉक्टरांकडून उपचार घेणं शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या खूपच कठीण झालं आहे. सरपंचांनी शासनाकडे बाधित शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची आणि गावात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय डॉक्टरची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.



