AchalpurLatest NewsMaharashtra

अचलपूर : जगदंब महाविद्यालयात विणकर समाजातील मान्यवरांचा सत्कार सोहळा

अचलपूर : श्री जगदंब विणकर शिक्षण संस्थेद्वारा संचालित जगदंब महाविद्यालयात नुकताच विणकर समाजातील मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते – महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ, मुंबई तर्फे राष्ट्रीय विणकर दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री. जगदंब विणकर शिक्षण संस्थेला प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचा गौरव करणे. हा पुरस्कार मुंबई येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री मा. छगनराव भुजबळ यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष रमाकांत शेरकार व सहसचिव सुदाम मुगल यांनी स्विकारला.

संस्थेचे अध्यक्ष रमाकांत शेरकार यांनी सांगितले की, “समाजातील ज्यांनी विणकरी क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करून समाजाला दिशा दिली अशा बांधवांचा सन्मान करणे हीच आमच्या संस्थेची खरी जिद्द आहे.”

या सत्कार सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष रफिक सेठ, विलास काशीकर, सुधाकरराव नाकिल, संस्थेचे उपाध्यक्ष वारजुरकर सर, सचिव भीमराव दखणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश कोहळे, जगदंब विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रजनी शेरकार यांसह कार्यकारिणी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. टी.के. वाहाने यांनी केले, संचालन डॉ. श्रुती पांडे यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. अविनाश कोहळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button