सोनं-चांदी खरेदीसाठी सुवर्णसंधी! दर घसरले, खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी

अमरावती | ८ सप्टेंबर २०२५
आज, ८ सप्टेंबर २०२५ रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली असून खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. २४ कॅरेट सर्वात शुद्ध सोन्याच्या दरात तब्बल १,१०० रुपयांची घट झाली आहे. यामुळे १० ग्रॅम सोनं आता ₹१,०८,३८०, तर १०० ग्रॅम ₹१०,८३,८०० ला उपलब्ध झाले आहे.
२२ कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली असून १० ग्रॅमचा भाव ₹९९,३५० तर १०० ग्रॅम ₹९,९३,५०० इतका झाला आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याच्या दरात ८० रुपयांची घट झाली असून १० ग्रॅम ₹८१,२९० आणि १०० ग्रॅम ₹८,१२,८०० पर्यंत खाली आला आहे.
सोन्यासोबतच चांदीचे दरदेखील कमी झाले असून १ किलो चांदीचा भाव ₹१,२७,००० वर घसरला आहे.
गणेशोत्सव संपताच आता नवरात्री, दसरा आणि दिवाळी अशा मोठ्या सणांची आतुरता सुरू झाली आहे. या काळात सोनं-चांदी खरेदी करण्याची परंपरा असल्याने दर घसरल्यामुळे बाजारात खरेदी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत यामुळे सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे खरेदीदारांनी ही सुवर्णसंधी साधावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.



