Helth CareLatest News
शेंबाळपिंपरीत धार्मिक कार्यक्रमानंतर २५ जणांना फूड पॉईझनिंग

यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर २५ जणांना फूड पॉईझनिंग झाले. यात लहान मुले आणि महिला यांचा समावेश होता.
मेजबानीनंतर लोकांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखी सुरू झाला. त्यानंतर तात्काळ त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सुरुवातीला काही जणांची प्रकृती गंभीर होती, पण डॉक्टरांच्या वेळेवर उपचारामुळे सर्वांचा जीव वाचला. सध्या सर्व रुग्णांवर पुसद येथील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून गावातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी सुरू केली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव सरकुंडे यांनी नागरिकांना स्वच्छता आणि आहाराची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे, विशेषतः पावसाळ्यात जलजन्य आजार आणि अन्न विषबाधेपासून बचावासाठी.



