BuldhanaLatest News

बुलढाण्यात शेतकऱ्याचं अनोखं आंदोलन; 300 फूट उंच टॉवरवर चढून केला निषेध

बुलढाणा शहरात आज एक नाट्यमय प्रसंग घडला. कोर्ट रोडवरील BSNL ऑफिसच्या 300 फूट उंच टॉवरवर एका शेतकऱ्याने चढून आपली मागणी प्रशासनापुढे ठामपणे मांडली.

राजू भीमराव काकडे असे या शेतकऱ्याचे नाव असून तो येळगाव येथील रहिवासी आहे. त्याची शेती धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेली असून उर्वरित जमीन नगरपालिकेच्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी वापरली जात असल्याचा त्याचा आरोप आहे. याच निषेधार्थ त्याने थेट टॉवरवर चढून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

घटनेची माहिती मिळताच बुलढाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती गंभीर होऊ नये म्हणून पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांनी राजू काकडेंशी वारंवार संवाद साधला. त्याच्या मागण्यांचा विचार करण्याचं आश्वासन दिल्यानंतर अखेर मोठ्या शिताफीने त्याला सुरक्षित खाली उतरवण्यात यश आलं.

या प्रसंगामुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

आता राजू काकडे याच्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button