BuldhanaLatest News

बुलढाणा जिल्ह्यातील खंडाळ्यात ‘ब्लड मून’चा अद्भुत नजारा

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा गावात काल रात्री नागरिकांनी दुर्मिळ खगोलीय घटना प्रत्यक्ष अनुभवली. पौर्णिमेच्या रात्री घडलेल्या या चंद्रग्रहणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी चंद्रग्रहणाची सुरुवात झाली, तर मध्यरात्री ११ वाजता चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या गडद सावलीत आला. या वेळी चंद्र गडद लालसर रंगाचा दिसत होता. या अद्वितीय दृश्याला ‘ब्लड मून’ असे संबोधले जाते.

चंद्रग्रहण ही घटना पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधोमध आल्यानंतर घडते. पृथ्वीच्या वातावरणातून परावर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे चंद्राला लालसर झळाळी प्राप्त होते. यामुळे रात्रीचे आकाश मोहक विलोभनीय दृश्यांनी उजळून निघाले.

खंडाळ्यासह अनेक ग्रामीण भागांमध्ये लोकांनी पारंपरिक पद्धतीनुसार ग्रहणापूर्वी जेवण करून घेतले आणि ग्रहणकाळात घरातच राहण्याची प्रथा पाळली. तर अनेक जणांनी आकाशाकडे डोळे खिळवून हा अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद केला.

या अद्भुत खगोलीय घटनेचा साक्षीदार होण्याचा अनुभव नागरिकांसाठी खास आणि संस्मरणीय ठरला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button