नेपाळ: सोशल मीडिया बंदीविरोधात तरुण पिढी रस्त्यावर

काठमांडू : नेपाळ सरकारने ४ सप्टेंबर २०२५ पासून फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी लागू केली. फेक न्यूज आणि अफवा पसरवण्याच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
या बंदीच्या विरोधात नेपाळची तरुण पिढी रस्त्यावर उतरली, आणि काही आंदोलनकारी थेट संसदेच्या परिसरात पोहोचले. सुरक्षा रक्षकांनी त्यांना संसदेच्या परिसरात अडवले. काठमांडूसह चार जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
आंदोलनात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू आणि ८० जखमी झाले आहेत. भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा दलांना हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
नेपाळ सरकार म्हणते की, देशाच्या सुरक्षेसाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता, तर नागरिकांकडून स्वातंत्र्यावर प्रभाव पडल्याचे मत व्यक्त केले जात आहे.



